करमाळा सोलापूर जिल्हा

कंदर ते सातोली या रस्त्याच्या नव्याने मजबुतीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या सुचना; आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्नांना यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कंदर ते सातोली या रस्त्याच्या नव्याने मजबुतीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या सुचना;

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्नांना यश

करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील कंदर ते सातोली (पाटीलवस्ती पासुन सातोली) पर्यंत रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी(मजबुतीकरणासाठी)मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले असल्याची माहिती आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सहकारी ज्ञानेश पवार यांनी दिली.

प्रजिमा१२(कंदर) ते सातोली इजिमा १११ हा रस्ता प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतुन २००८ साली करण्यात आला होता.त्यानंतर या रस्त्याची एकदा दुरुस्ती करण्यात आली होती.

परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था प्रचंड दयनिय झाली असुन अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पुल वाहुन गेलेले आहेत.त्यामुळे नव्या पुलाचीही या ठिकाणी गरज होती.हा रस्ता बागायती क्षेत्रातुन जात असल्याने भाजीपाला तसेच ऊस वाहतुक व इतर वाहनांची संख्या या रस्त्यावर जास्त आहे.

तसेच शाळेला जाणार्या विद्यार्थांची संख्या ही जास्त असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची अवश्यकता होती.सद्या हा रस्ता जिल्हापरिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी १० कि.मी चे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यात विशेष लक्ष घालुन सदर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ विकास व संशोधन अंतर्गत मंजुरी मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांना पत्रादवारे विनंती केली होती.

हेही वाचा – करमाळा-पुणे रोडवरील रस्त्याचे काम अपूर्ण, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत; अपघाताला निमंत्रण

करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘या’ तीन जिल्हा प्रमुख मार्गाना राज्य मार्गाचा दर्जा द्या; बांधकाम मंत्र्यांना निवेदन

त्यावर प्रधान सचिव ग्रामविकास यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने या रस्त्याचे नव्याने मजबुतीकरण होणार आहे त्यामुळे या भागातील नागरीकांची गैरसोय टळणार आहे.

स्थानिक गरज लक्षात घेवुन या भागातल्या दळणवळनाच्या प्रश्नी लक्ष घातल्याबद्ध या भागातील नागरिकांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!