करमाळा राजकारण

अतुल खूपसे-पाटील यांनी घेतली खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट, राष्ट्रवादीसोबत..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अतुल खूपसे-पाटील यांनी घेतली खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट, राष्ट्रवादीसोबत..

 करमाळा (प्रतिनिधी); राज्य मंत्रिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पडलेली उभी दरी यामुळे पावसाळी वातावरणात राज्यामध्ये शरद राष्ट्रवादी व अजित राष्ट्रवादी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष पेटला आहे. एकीकडे एक एक आमदार अजित पवारांच्या गावाला लागत आहे तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 

याच पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा इरादा पक्का करत आज मुंबई येथील वाय बी सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर सिल्वर ओक येथे खा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अतुल खूपसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचा कृषिमंत्री कोण..? हे आजही राज्यासह देशातील ८५ टक्के जनतेला माहित नाही. मात्र कृषिमंत्री हा शब्द उच्चारताच जनतेच्या समोर आदराने शरद पवार यांचा चेहरा दिसतो. खा. शरद पवार यांनीच राज्यसह देशातील सर्वोच्च असलेली कर्जमाफी केली होती. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला होता. 

यावेळी ना कोणत्या अटी होत्या ना कोणते नियम होते न कोणता ऑनलाईन चा तगादा होता. त्याच्यानंतर कोणतीच कर्जमाफी कोणत्याच सरकारने घेतली नाही. शरद पवार आजही बांधावर उतरून शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. 

त्यामुळे आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून आज सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे खा. शरद पवार यांच्याशी शेती, पाणी, पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे आल्या असता त्यांनी सायंकाळी सिल्वर ओक वर भेट देण्यास सांगितले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याशी अतुल खूपसे पाटील व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली.

 दरम्यान लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रचार प्रमुख खा.अमोल कोल्हे यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवू असे आश्वासन सुळे यांनी दिले असल्याची माहिती खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी विनिता बर्फ, रोहण नाईकनवरे, हर्षवर्धन पाटील, शर्मिला नलावडे, निखिल नागणे, रे भारती पाटसकर, विशाल पाटसकर, केशव लोखंडे यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!