करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर
करमाळा(प्रतिनिधी); राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत सहभागी झाली असली तरी करमाळ्याची विधानसभेची जागा शिवसेनेचे असून ही जागा करमाळा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्हावर लढणार असून सावंत बंधू सांगतील तोच या करमाळ्याचा आमदार होईल असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे
करमाळ्याची विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी अजित दादा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर करमाळा तालुक्याची राजकीय गणिते वेगाने बदलू लागली आहेत
या पार्श्वभूमीवर करमाळा शिवसेनेची तातडीची बैठक शिवसेना कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे उप तालुकाप्रमुख दादासाहेब थोरात प्रशांत नेटके सतीश रुपनवर शिवसेना प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक दीपक पाटणे शिवकुमार चिवटे शिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर नागेश शेंडगे वाडीचे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ खांबेवाडी चे नाथा नरोटे उपस्थित होते
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की करमाळा मतदार संघ शिवसेना-भाजप युती असल्यापासून शिवसेनाच लढवत आहे आत्तापर्यंत तीन वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे.
यावेळी सुद्धा शिवसेनेत गटबाजी झाल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना धनुष्यबान चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहे
येणाऱ्या आगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे सांगून
त्यात होणाऱ्या घडामोडीचा करमाळ्यातील शिवसेनेवर काही फरक पडणार नाही
हेही वाचा – करमाळ्यातील बागल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतीश कांबळे, विकास काळे व्हाईस चेअरमन
देवदर्शनाहून परतताना झालेल्या भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रीटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण करणे, करमाळा बस स्थानकासाठी 15 कोटी मंजूर करणे
सर्व प्रशासकीय इमारत एकत्रित करण्यासाठी दहा कोटी मंजूर करणे ही कामे प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी मंजुरीसाठी शिफारस केली आहेत
यावेळी सर्व शिवसैनिकांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखाली लवकरच भव्य मेळावा घेण्याची नियोजन करण्याचे ठरवून तयारी ला लागण्याचे आवाहन केले.
Add Comment