करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

खा. रणजितसिंह निंबाळकरांनी आमदार संजय मामांना घेतले सोबत, राजकीय चर्चांना उधाण; पाणी प्रश्नाच्या आडून निंबाळकरांची लोकसभा मोर्चे बांधणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खा. रणजितसिंह निंबाळकरांनी आमदार संजय मामांना घेतले सोबत, राजकीय चर्चांना उधाण; पाणी प्रश्नाच्या आडून निंबाळकरांची लोकसभा मोर्चे बांधणी

केतूर (अभय माने) माढा लोकसभा साठी भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा ठोकल्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा एकदा जुन्या सहकार्यांना बरोबर घेऊन लोकसभेची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला याचा प्रत्यय कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत दिसून आला.

या बैठकीत खासदार निंबाळकर यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांना टाळून भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांना निमंत्रण देऊन आपला आपला इरादा कृतीतून स्पष्ट केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता तेव्हापासूनच खासदार निंबाळकर व आमदार संजय मामा शिंदे यांच्या दुरावा निर्माण झाला होता.

या निवडणुकीदरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक लाख मताचा लीड संजय मामा शिंदे वर टाकणार अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ अशी घोषणा करून खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना खासदार करण्यात खऱ्या अर्थाने सिंहाची भूमिका बजावली.

मतदार संघातून एक लाखाचे मताधिक्य खासदार रणजीत निंबाळकर यांना मोहिते पाटील कुटुंबाने मिळून दिल्यामुळे खासदार निंबळकरांचा विजय सुखर झाला.

मात्र प्राप्त परिस्थितीत सध्या माढा खासदारकीवर मोहिते पाटील गटाने दावा दाखवत असलेल्या चर्चेने खासदार रणजीत निंबाळकर यांनी सावध भूमिका घेत जुन्या मित्रांना पूर्ण एकत्र केल्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येते माढा लोकसभा मतदारसंघात आमदार संजय मामा शिंदे यांचा माढा व करमाळा या मतदारसंघाचा मोठा फायदा रणजीत सिंह निंबाळकर यांना होऊ शकतो.

त्याचबरोबर याच मतदारसंघातील शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे, खासदार निंबाळकर यांच्या सोबत असल्याचे दिसून येते तर लगेच तातडीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःच्या उपस्थितीमध्ये पुण्यात माजी आमदार नारायण पाटील सहकारी आपल्या समर्थक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यासह पुण्यात जलसंपदा विभागात बैठक घेतली.

एकाच विषयासाठी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी घेतलेली बैठक व त्यानंतर तात्काळ रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी घेतलेली बैठक यामुळे पाण्याच्या प्रश्न अडून खासदारकीची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या राजकारणातल्या मनी प्रमाणे आज की डावपेच आखली जात आहेत.मोहिते पाटील विरुद्ध आमदार संजय मामा शिंदे हा संघर्ष संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळखून आहे.

लोकसभेची उमेदवारी मोहिते पाटलाच्या घरात गेली तर संजय मामा शिंदे त्यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावणार हे निश्चित आहे हे ओळखूनच माढा लोकसभेचे गणित खासदार निंबाळकर मांडत असल्याची दिसून येत आहे.

हे करत असताना मात्र 2019 च्या निवडणुकीत खासदार निंबाळकर यांची काम करणारे आमदार माजी आमदार नारायण पाटील यांचा विसर खासदार निंबाळकर यांना पडल्याचे दिसून येत आहे.

एकंदरीत माढा लोकसभा निवडणुकीसाठी कुकडीच्या पाण्याच्या निमित्ताने खासदार निंबाळकर साखर पेरणी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!