करमाळा (प्रतिनीधी); तूर हमीभाव खरेदी केंद्र करमाळा येथे सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांना 4हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने आपली तुर नाईलाजाने व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे. व्यापारी सुद्धा सर्व कायदे धाब्यावर बसून हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत, तरी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्काळ तूर हमीभाव केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना चिवटे म्हणाले की पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल हा शासनाचा तुरीचा हमीभाव आहे या भावा पेक्षा कमी दराने तूर खरेदी करणे गुन्हा आहे बाजारात तुरीचे भाव कमी झाले आहेत तर दुसरीकडे शासकीय हमीभाव केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही तूर विकायची कुणाकडे असा प्रश्न पडला आहे करमाळा तालुक्यात यावर्षी जिरायती क्षेत्रात पांढऱ्या तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.

एकरी पाच ते सहा क्विंटल उतारा पडत असून प्रत्येक शेतकऱ्याला थोड्याफार प्रमाणात तुरीचे उत्पन्न मिळाले आहे मात्र उत्पन्न झालेली तुर व्यापारी संगनमताने चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करत आहेत प्रतिक्विंटल हजार ते पंधराशे रुपये कमी दराने शेतकऱ्यांना पुर विकावी लागत आहे शेतकऱ्याची दहा क्विंटल तूर असली तरी त्याचे किमान दहा हजार रुपये नुकसान होत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पै-पै महत्त्वाचे असताना शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे जिल्ह्यात इतर तालुक्याच्या ठिकाणी तूर हमीभाव केंद्र सुरू झाले आहेत करमाळा मार्केट कमिटी मात्र तूर हमीभाव केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे मार्केट कमिटीचे चेअरमन शिवाजीराव बंडगर याबाबत काही बोलत नाहीत. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

⚫ #माढा- मंत्रीपद नको होतं तेव्हा ‘घ्या-घ्या म्हणत होते’ आणि आता मागुन ही मंत्रीपद मिळना; आ.शिंदे

⚫ ‘तुम्ही तहसीलदार ना? मग ही खुर्ची तुमची आहे…बसा इथे’ खुद्द मुख्यमंत्री प्रेमळ शब्दांत आदेश देतात तेव्हा..! सारेच अवाक

⚫ केतूर येथील डॉ दोभाडा यांचे आकस्मिक निधन; मृत्यूनंतर संपूर्ण देहदान केल्याने नवा आदर्श, देहदानाची चर्चा

तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आठ दिवसाच्या आत करमाळा येथे तूर हमीभाव केंद्र सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तूर फेको आंदोलन तहसील कचेरीत करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार माने व पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना देण्यात आलेले आहेत.