करमाळा सोलापूर जिल्हा

वृक्ष लागवड व संवर्धनच्या नावाखाली सरकारचे लाखो रुपये पाण्यात …..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वृक्ष लागवड व संवर्धनच्या नावाखाली सरकारचे लाखो रुपये पाण्यात …..

केत्तूर:- महाराष्ट्र शासन वृक्ष लागवड करण्यासाठी व वृक्ष संवर्धन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. परंतु वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हे दोन्ही हेतू साध्य होत नसल्याचे चित्र करमाळा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या कारभारावरून दिसून येते. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करण्याची सवय असलेल्या या विभागास झाड जगवण्याचे कोणतेही सोयरसुतक पडले नाही.

ट्रॅकंर खेपा, खुरपणीसाठी,लावलेले मजूर, नवीन रोपवाटिका यामध्ये इत्यादी प्रत्येक गोष्टीमध्ये मोठ्या भ्रष्टाचार करण्याचे काम हा विभाग करत असल्याचा आरोप होत आहे. करमाळा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य काम लोकांच्या सहभागातून वनक्षेत्र वाढवण्याचे काम असते. परीसरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या मध्ये वृक्ष लागवडची आवड निर्माण करणे हे असते. परंतु या विभागाचे अधीकारी कोणाचेच फोन घेत नाहीत.

संपर्क करावयाचा प्रयत्न केल्यास त्यांना संपर्क होत नाही अशा तक्रारी जनतेतून येत आहेत. तसेच प्रत्यक्षात लावलेली झाडे व जिवंत झाडे यांचे प्रमाण किती आहे हे ही सांगितले जात नाही. सामाजिक वनीकरण विभागाच्या या अशा कारभारा विरुद्ध अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. 

हेही वाचा – केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची मागणी; वाचा सविस्तर

प्रत्येक वर्षी जून व जुलै मध्ये महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग हजारो झाडांची रोपे मागवते पण ते रोपे कुठे लावली जातात व त्या रोपांचे संवर्धन होते का हा संशोधनाचा विषय आहे.वड,पिंपळ,करंज,इत्यादी वृक्षाची लागवड करून त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज बनली आहे.

मानसिंग खंडागळे सामाजिक कार्यकर्ते गुळसडी

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!