श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ.बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन 101 देशी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतली वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ.बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन

101 देशी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतली वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी

केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी डॉ. बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्क या पर्यावरण पूरक उपक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.


या कार्यक्रमात विविध प्रकारची 101 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाची सुवर्णसंधी साधत, निसर्गाचा पर्यावरणपूरक समतोल साधण्यासाठी या शालेय परिसरात भरपूर ऑक्सिजन मिळण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली.


या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर, उपाध्यक्ष पल्लवी सचिन रणशिंगारे, उपाध्यक्ष गणेश तळेकर, सागर कुरडे, विजयकुमार तळेकर , हरिभाऊ तळेकर, राहुल रामदासी, लक्ष्मण गुरव, धनंजय ताकमोगे, दत्तात्रय खुपसे,अमृता सुनील दोंड, गणेशआबा तळेकर, सचिन रणशिंगारे, पैलवान शिवाजी पाटील, प्राचार्य सुभाष कदम, प्रा.अमोल तळेकर, वस्तीगृह अधीक्षक सागर महानवर, ज्युनिअर कॉलेजचे सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – ३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा तालुक्यातील उजनी प्रकल्पातील पुनर्वसित 30 गावांच्या समस्या बाबत बैठकीचे आयोजन; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

या ऑक्सिजन पार्कसाठी दादाश्री फाउंडेशन वीटचे संस्थापक काका काकडे यांनी सर्व रोपे मोफत उपलब्ध करून देऊन अनमोल सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

karmalamadhanews24: