सावित्रीबाईंचा वसा जपणा-या ओम महिला मंडळाचे कार्य गौरवास्पद: धनश्री दळवी

सावित्रीबाईंचा वसा जपणा-या ओम महिला मंडळाचे कार्य गौरवास्पद: धनश्री दळवी

करमाळा (प्रतिनिधी); ओम महिला सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांचा नुकताच संक्रांतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संक्रांत निमित्त शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेण्याचा स्तुत्य उपक्रम ओम महिला मंडळाने केला.

सावित्रीबाईंचा वसा जपणा-या ओम महिला मंडळाचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे.असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहालय स्कूलच्या संचालिका धनश्री दळवी यांनी मांडले.
पुढे त्या म्हणाल्या की ओम महिला मंडळाचा आदर्श हा घेण्यासारखा आहे.सातत्याने असे समाजपयोगी कार्यक्रम ओम महिला मंडळा द्वारे घेतले जातात.

दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
शिक्षणासाठी मुली वंचित राहू नये म्हणून गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते.

आज पर्यंत चाळीस मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन ओम महिला मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली असे मत साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या व मंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकात मांडले.
मा.डा.कविता कांबळे,मा.पल्लवी निंबाळकर , मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.काळे सर व रेड्डी सर यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली.

समिक्षा सोमनाथ राऊत.इ २ री मुकबधीर विद्यालय देवीचामाळ करमाळा.येथील विद्यार्थीनीस शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा गौरवास्पद कार्यक्रम घेण्यात आला.
रेशमा जाधव,अलका यादव,सुनिता यादव, बालिका यादव ,रुपाली मिसाळ यांनी स्वागत गीत सादर केले.

हेही वाचा – उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुपच्या वतीने करमाळा तालुक्यातील ‘या’ पत्रकारांचा झाला सन्मान

शेतकरी राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर झळकणार, टिझरला उदंड प्रतिसाद; ‘नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

शहनाज मोमीन,उषा बलदोटा, जयश्री वीर, जयश्री लुणीया यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन ज्योती पांढरे व मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी केले तर आभार पुष्पा लुंकड यांनी मानले.

karmalamadhanews24: