मृग नक्षत्राच्या पाऊसाने करमाळ्याला झोडपले:१८४ मिलीमीटर पाऊसाची नोंद: बळीराजा वाफस्याच्या प्रतीक्षेत

मृग नक्षत्राच्या पाऊसाने करमाळ्याला झोडपले:१८४ मिलीमीटर पाऊसाची नोंद: बळीराजा वाफस्याच्या प्रतीक्षेत

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
यंदाच्या तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीनंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावल्या नंतर मृग नक्षत्राच्या जोडावर जोरदार पावसाचे आगमन झाले असून १ जुन ते १०जुन दरम्यान तब्बल १८४.६ मिलिमीटर पावसाची नोंद आठ मंडळामध्ये करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्याचे यंदाचे तापमान 44 अंशापर्यंत शिखरावर गेले होते.

यादरम्यान प्रचंड उन्हाचा फटका शेतकरी वर्गाला तसेच सर्वसामान्यना बसला होता मात्र उन्हाळी हंगाम सपंताच कल्याण कृतिका, रोहिणी तसेच मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यंदा उन्हाळ्याच्या तीव्र झळाया व पाण्याचे दुर्भिक्षय असणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाच्या आगमनाने हायसे वाटले आहे .
रोहिणी व मृग नक्षत्राच्या जोडावर करमाळा शहर व तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला आहे. करमाळा तहसीलच्या आठ मंडळामध्ये काल रविवारी 20.9 मिलिमीटर पावसाची नोंद महसूल दप्तरी झाली आहे. सर्वात जास्त कोर्टी मंडळात 56.3, केतुर मंडळात 33 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे . केम मंडळात रविवारचा पाऊस अवघा 3.3 मिलिमीटर नोंदला गेला आहे. सालसे मंडळात फक्तं 1.3 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.


रविवारी झालेल्या पावसाची आकडा व कंसात येत्या दहा दिवसातील सरासरी आकडेवारी मिलिमीटर मध्ये.
करमाळा 19 मिलिमीटर ( २४७.३ ), अर्जुननगर 183 (228 मिलिमीटर), केम 3.3 (105.8), जेऊर 17.8 (217.2), सालसे 1.3 (121.9), कोटी 56.3 (85.9), उमरड 17.8 (209.7), केतुर 30 (162.6).

करमाळा तालुक्यामध्ये सहा जूनला 32.7, सात जूनला 60.9, 9 जूनला 43.7 तर 10 जून रोजी 20.9 मिलिमीटर पावसाची नोंद करमाळा महसूल दप्तरी नोंद झाली आहे.
गेल्या दहा दिवसाच्या दरम्यान तब्बल 184.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रविवारी तालुक्यामध्ये 20.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यात उमरड येथे 209.7 या मंडळात गेल्या दहा दिवसात पावसाची नोंद झाली आहे. जेऊर मंडळात २१७.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अर्जुन नगर मंडळात 228 तर करमाळा मंडळामध्ये सर्वात जास्त 247.3 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. करमाळा शहर व तालुक्यात सध्या समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी अद्यापही पाऊस न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हिवरवाडी, मांगी, पूनवर या ठिकाणी पाऊस झालेला नसल्याने या ठिकाणी बळीराजा अजूनही उन्हाळी मशागतीत मशगुल असून तो पाऊसाच्या प्रतीक्षेत आहे.


सध्या करमाळा, पोथरे, बिटरगाव, खडकी, आळजापुर, जातेगाव, तरडगाव ,पाडळी ,घारगाव, वीट, विहाळ ,कोर्टी, सावडी, कुंभारगाव ,रावगाव, पोंधवडी, पोफळज ,उमरड, कोंडेज ,देवळाली, खडकेवाडी, कुंभेज, निंभोरे, सौंदे, साडे, पांडे ,आवाटी ,केम, पाथुर्डी, कंदर, कविटगाव, पांगरे, शेलगाव, वांगी, चिकलठाण , कुगांव, शेटफळ, खडकेवाडी, रोसेवाडी, पिंपळवाडी, मोरवड, पारेवाडी ,हिंगणी आदी गावामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याचे वृत्त आहे

सध्या करमाळा तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला असून शेतकऱ्याकडून तूर ,उडीद, मका या पिकांच्या बियाणाला मोठी मागणी होत आहे .गेल्या अनेक हंगामा पेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
.. ऋषभ गादिया, बी बियाणे खत विक्रेते, करमाळा

शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये नऊ इंच पेक्षा अधिक खोलीवर ओल झाल्यासच बियाण्याची पेरणी करावी. बियाणे खरेदी करताना तपशिलासह पावती घ्यावी. तसेच एमआरपी पेक्षा अधिक किमतीने बियाणे विक्री होत असेल तर याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडे द्यावी.
.. संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, करमाळा

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पेरणी योग्य पाऊस झाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कमी अधिक दरात बियाणांची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत बियांनाची विक्री केली जात आहे. बियाणांच्या दरात बरीच तफावत आढलून येत आहे. यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एमआरपी पेक्षा कमी किमतीत बियाणे उपलब्ध होत असले तरी बियाणेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जागृती करून काळजी घ्यावी.
… नसरुल्ला खान शेतकरी, आवाटी

karmalamadhanews24: