करमाळा

भैरवनाथ शुगरचा बॉयलर प्रदिपण समारंभ संपन्न; चार लाख टन गळपाचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भैरवनाथ शुगरचा बॉयलर प्रदिपण समारंभ संपन्न; चार लाख टन गळपाचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी): 

भैरवनाथ शुगर कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला असून या हंगामात किमान चार लाख टन ऊस गाळपाचे नियोजन करून कर्मचाऱ्यांनी सभासदांची संपर्क ठेवून चांगल्या दर्जाचा ऊस मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आव्हाहन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांनी केले. भैरवनाथ शुगर विहाळ या कारखान्याचा तेरावा गळित हंगामाचा बॉयलर प्रदीपण समारंभ अनिल दादा सावंत यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,आजिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेंद्रे, कार्यकारी संचालक अरुण बनगर, प्रसिद्ध उद्योजक भरत भाऊ आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास गुंडगिरी, प्रगतशील बागायतदार महादेव नवले, सरपंच मांजरगाव आप्पासाहेब खरात दादासाहेब कोकरे, सरपंच रेटेवाडी 

भैरवनाथ शुगर ऑल स्टॉप व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावर्षी सुद्धा चांगल्या दर्जाचा ऊस कारखान्यास आला तर भैरवनाथ शुगर सुद्धा इतरांप्रमाणे दर देण्यासाठी वचनबद्ध आहे. मात्र चांगला ऊस व इतर कारखान्याला द्यायचा व निडवा ,265 कवळाभ या कारखान्याला द्यायचा असी मानसिकता शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे असे आव्हान सावंत यांनी केले.  कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन ऍग्री सुपरवायझर मनोहर गुंडगिरी यांनी केले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!