करमाळा जेऊर राजकारण सोलापूर जिल्हा

कंदर ग्रामपंचायत अटीतटीच्या लढतीत सरपंच पदी जगताप गटाचे मौला साहेब मुलाणी यांचा बहुमताने दणदणीत विजय; वाचा सविस्तर आकडेवारी सह विजय उमेदवार यादी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कंदर ग्रामपंचायत अटीतटीच्या लढतीत सरपंच पदी जगताप गटाचे मौला साहेब मुलाणी यांचा बहुमताने दणदणीत विजय; वाचा सविस्तर आकडेवारी सह विजय उमेदवार यादी

जेऊर (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील कंदर येथील ग्रामपंचायत माजी आमदार जयंतराव जगताप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे या निवडणुकी मध्ये संरपंच पदासाठी पाच उमेदवारा मध्ये लढत होऊन जगताप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे मौलासाहेब मुलाणी विजयी झाले आहेत .

ग्रामपंचायत सदस्या मध्ये तिरंगी लढत होऊन जगताप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनने आठ जागेवर विजय मिळऊन भांगे आणि बागल गटाची विजयाची परंपरा मोडीत काढुन सत्ता प्रस्थापित करत विजय मिळविला आहे.

कंदर ग्रामपंचायती मध्ये १५ जागेसाठी जगताप पुरस्कृत कंदर विकास परिवर्तन पॅनल आणि कट्टर विरोधक असणारे लोकरे गट आणि भांगे गट यांच्यात तिरंगी लढत झाली.

या निवडणुकीत जगताप
पुरस्कृत कंदर ग्रामविकास परिवर्तन ला आठ ,भांगे गटाला एक बागल गटाला चार आणि पाटील गटाला दोन जागा मिळाल्या . ग्रामपंचायत स्थापने पासुन आजतागायत लोकरे आणि भांगे गट आमने सामने लढत होती,

गेल्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भांगे गटाने तिरंगी लढत होऊन संरपंच पद मिळविले होते.या निवडणुकीत भांगे आणि लोकरे यांनी युती करून निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला . परंतु जागे वाटपावरून वाद झाल्याने युती फिसकटली आणि शेवटी परस्पर विरोधी उभे राहिले.

जगताप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे विजयी झालेले उमेदवार सरपंच मौलासाहेब मुलाणी (१२००), उदयसिंह नवनाथ शिंदे (४४९), रशीदा रशीद शेख(३७२), कमल बाळु लोंढे(२८३), अमोल मधुकर भांगे(३६२), रतन भारत भोसले(२९२), दीपक प्रभाकर घोडकोस(३६९), तब्बूसुम इकबाल हवालदार(३७८), अनिता बाबुराव मंजुळे (२५३), भांगे गट- राहुल राजकुमार भांगे(३६६), बागल गट-सौ नवल भैरवनाथ डोके(252), रावसाहेब शंकर जाधव(३५५), कुबेर नवनाथ शिंदे(२७८), शालन ब्रम्हदेव अरकिले(२९९), भांगे- पाटील युती – अरुण सौदागर यादव (३६७), वैष्णवी विजयसिंह नवले(340)हे विजयी झालेले उमेदवार आहेत.

जगताप गटाचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार मौलासाहेब मुलाणी यांची त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंदर शहरांमध्ये जल्लोषात मिरवणूक काढली होती.

हेही वाचा – माढा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी

करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने दिले जीवनशिक्षणाचे धडे; अधिकाऱ्यांनी केले कौतुक!

ग्रामपंचायत सरपंच पदासाठी दोन अपक्ष सह पाच उमेदवार उभे होते, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उमेश इंगळे यांनी यांनी ९१२ मते घेऊन तिसरा क्रमांक घेतला, संतोष यांना ७६ मते पडली. उध्वव भोसले यांना ७५५ तर गणेश जगताप यांना ९२९ ,मौलासाहेब मुलानी यांना १२०० मते पडल्याने ते विजयी झाले.

जगताप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल मधील नवनाथ शिंदे, अण्णासाहेब पवार, संपत सरडे,राजकुमार सरडे ,शिवशंकर माने दाउद मुलानी मौलासाहेब मुलानी ,दिलावर शेख, विठ्ठल काळे, आखलाख जहागीदार, दस्तगीर मुलाणी यांनी विजय मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!