भोसगे दलित वस्तीतील कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे चौकशी करण्याचे पुणे आयुक्ताकडे रिपाइ ची मागणी
अक्कलकोट तालुक्यातील मौजे भोसगे येथील दलित वस्ती सुधारणा योजनेतील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून त्याचे कसून चौकशी करण्यात यावे अशी मागणीचे पत्र विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे रिपाइ (आठवले गटा)चे शाखाध्यक्ष मलकण्णा सोनकांबळे यांनी केली आहे मौजे भोसले येथील दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत इ.स 2020 पासून आज पर्यंत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं सविस्तर माहिती माहितीच्या अधिकारात घेतलेल्या विशेष करून
कळाली असून त्याचे सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे निवेदन आदि अक्कलकोटचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता अधिकारी सोलापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली होती येथील विविध कामात झालेल्या संपूर्ण माहितीचे प्रति व मंजुरी झालेल्या निधीचे माहिती सविस्तरपणे दिलेली आहे तरी आपणही जातीने लक्ष घालून संपूर्ण विषयाचे गंभीर्या ओळखून चौकशी करून संबंधित सर्वांवर कारवाई करण्यास भाग पाढावे जेणेकरून यापुढे तालुका किंवा जिल्ह्यात परत अशा भ्रष्टाचार होऊ नये अशी मागणी पुणे विभागीय आयुक्त कडे रिपाइ भोसगे शाखा चे अध्यक्ष मलकण्णा सोनकांबळे यांनी केली आहे जर या निवेदनाच्या दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर या विरोधात तीर्व आंदोलन छेडण्याचा इशारा श्री सोनकांबळे यांनी केले आहे.
Add Comment