दसरा व दिवाळी सणासाठी नागरिकांना 60 रुपये किलो दराने मार्केट यार्डातून मिळणार हरभरा डाळीचा; नागरिकांनी लाभ घेण्याचे शंभूराजे जगताप यांचे आवाहन

दसरा व दिवाळी सणासाठी नागरिकांना 60 रुपये किलो दराने मार्केट यार्डातून मिळणार हरभरा डाळीचा; नागरिकांनी लाभ घेण्याचे शंभूराजे जगताप यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारत सरकार च्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेड यांच्या वतीने खास दसरा सण व दिवाळी सणा निमीत्त नागरिकांसाठी मागेल त्याला ६० रु . किलो या सवलतीच्या दरात भारत डाळ च्या नावाने एक आधार कार्ड वर ५ किलो हरभरा डाळ विक्री केली जाणार आहे .

तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक व खरेदी- विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी केले आहे. आज दि. १२ आक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते मार्केटयार्ड करमाळा येथे उद्घाटन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

हेही वाचा – राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गरड यांचा जेऊर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील धक्कादायक घटना; तेरा वर्षाच्या मुलीवर दोन दिवस अत्याचार; अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न!

यावेळीखरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा बाजार समितीचे नुतन संचालक शंभुराजे जगताप महादेव कामटे, मनोज पितळे, विकीशेठ मंडलेचा, विलास जाधव, सोनूशेठ वीर ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर व सर्व कर्मचारी वृंद, सचिन शिंदे
नाना मोरे पंकज (बापु) वीर आदी उपस्थित होते .

karmalamadhanews24: