छबिना पाहण्यासाठी भाविकांची गर्दी;भंडाऱ्याने न्हाऊन निघाली अंजनगाव नगरी अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाची यात्रा उत्सवात संपन्न

छबिना पाहण्यासाठी भाविकांची गर्दी;भंडाऱ्याने न्हाऊन निघाली अंजनगाव नगरी

अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाची यात्रा उत्सवात संपन्न

माढा प्रतिनिधी :
अनेक वर्षांची परंपरा असलेली अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली.यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते.देवाचा छबिना पाहण्यासाठी भावकांची गर्दी केली होती.श्री खेलोबा देवाच्या नावाने ‘चांगभलं’,विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने ‘चांगभलं’,च्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळण यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.

फरांडे श्री विश्वनाथ वाघमोडे यांचे नातू श्री खेलोबा वाघमोडे देव यांचा परजेचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी श्री खेलोबा देव हे आपल्या पोटावर तलवारीने वार करतात.ढोलाच्या आवाजात धनगरी ओव्या,धनगरी नृत्य व देवाचा घोडा भाविकांना पाहव्यास मिळाले.यावेळी सोंगांचे ट्रॅक्टर्स सजवण्यात आले होते. यामध्ये वाघ्यामुरळी, रामायणातील पत्रे,शिवशंकर पार्वती,जेजुरीचा खंडोबा बानू,म्हाळसा यांचा समावेश भाविकांना आकर्सित करीत होता.याचबरोबर गावातील विविध ग्रुपच्या वतीने डॉल्बी व बेंजोचे ही आयोजन करण्यात आले होते.

मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधून घेण्यात येत होते.यावेळी कुस्त्यांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
चार-पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या काळात भाविकांच्या मनोरंजनासाठी युवा ग्रुपच्या वतीने स्वरसंगम,गडेकर परिवाराच्या वतीने वैभव आणि सरकार ग्रुपच्या वतीने धमाका ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आलेे होते.

हेही वाचा – ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम – चेअरमन अशोक लुणावत नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण

चिंताजनक; अखेर सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण मायनसमध्ये; क्लिक करून वाचा किती उरला पाणीसाठी

याचबरोबर यात्रा काळात भावीकांना महाप्रसादाची आयोजन देखील करण्यात आली होती त्याचबरोबरयाचबरोबर यात्रा काळात भावीकांना महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आली होती त्याचबरोबर थंडगार मट्टाची सोय करण्यात आली होती.

ही यात्रा पार पाडण्यासाठी यात्रा पंच कमिटी,गावातील युवक वर्ग आणि विशेष करून माढा पोलीस स्टेशन सर्व टीम यांचे विशेष सहकार्य लाभले

karmalamadhanews24: