आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा उरूस 27 तारखेपासून

आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा उरूस 27 तारखेपासून

करमाळा (प्रतिनिधी); आवाटी तालुका करमाळा येथील हिंदू मुस्लिम भक्तगणांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांच्या उरसास येत्या 27 एप्रिल 2023 गुरुवारपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती उर्स पंच कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ यांनी बोलताना माहिती दिली.

आवाटी येथील सुफी संत हजरत वली चांद पाशा कादरी यांच्या आशीर्वादाने आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा येत्या 27 एप्रिल गुरुवार रोजी संदल शरीफ चा धार्मिक कार्यक्रम असून याच दिवशी रात्री दर्गाह पटांगणावर कव्वालीचा दुहेरी मुकाबला रंगणार असून यामध्ये राजस्थान येथील सुप्रसिद्ध कव्वाली गायक सरफराज साबरी तसेच भोपाळ येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका इंतजार चिस्ती यांच्यामध्ये कव्वालीचा दुहेरी मुकाबला होणार आहे सदर कव्वालीच्या कार्यक्रमाचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच दिनांक 28 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी हजरत आबिद अली शाह यांच्या जुलूस मिरवणुकीचा कार्यक्रम निघणार असून संपूर्ण गावातून सदर जुलुसाचा मार्गक्रम होणार आहे यामध्ये बाबाचा मानाचा घोडा असणार आहे पहाटे फजर ला दर्गा येथे जुलूस पोहचणार असून या ठिकाणी बाबांच्या मदारीवर चादर चढविण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत बँड वाद्यपदक सहभागी होणार असून यामध्ये करमाळा येथील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले रज्जाक ब्रास बँड, तसेच पाटोदा येथील जनता ब्रास बँड, बारामती येथील अमर ब्रास बँड, इट येथील झंकार ब्रास बँड, हे बँड वाद्यपदक आपली कला सादर करणार आहे.

याशिवाय दिनांक 27 एप्रिल गुरुवार संदल निमित्त आलेश्वर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील राज्यभरात प्रसिद्ध असलेले स्वर संगम ब्रास बँड हे बँड पथक आपली कला सादर करणार आहे
याशिवाय दर्गाह परिसरात वेगवेगळ्या रंगाची विद्यु त आकर्षक रोषणाई विजापूर येथील सादिक भाई यांनी केली आहे.

सदर उर्स व संदल या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भक्तगणांनी शांतता पद्धतीने घ्यावा असे आवाहन उर्स पंच कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ आवाटी यांनी केले आहे.

उजनीची वाटचाल मायनस कडे, शेतकरी चिंताग्रस्त; उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा; दररोज होतेय १% पाणी कमी

उजनी बॅकवॉटर मानवनिर्मित प्रदूषणामुळे जलचर परिसंस्था धोक्यात; पक्ष्यांच्या प्रजाती वर परिणाम; स्थलांतरित पक्षी बाधित

हिंदू मुस्लिम ऐक्याचा आजही राखला जातो एकोपा

आवाटी येथील हजरत आबिद अली शाह कादरी यांच्या उरूसा निमित्त आजही मुस्लिम भक्त गणा बरोबर हजारो हिंदू भक्तगण या दर्गावर आपली मुरादे पूर्ण करण्यासाठी येतात व मदार शरीफ वर चादर चढवितात राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन या ठिकाणी घडते याचाच अर्थ आजही या दर्गाहावर हिंदू मुस्लिम एकोपा टिकून आहे.

karmalamadhanews24: