माढा शैक्षणिक सोलापूर जिल्हा

राजवर्धन गुंडने केली कष्टातून स्वतःबरोबरच कुटुंबीयांची स्वप्नपूर्ती – विनोद परिचारक शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ; जशी खाण तशी माती जणू याचाच प्रत्यय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजवर्धन गुंडने केली कष्टातून स्वतःबरोबरच कुटुंबीयांची स्वप्नपूर्ती – विनोद परिचारक

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ; जशी खाण तशी माती जणू याचाच प्रत्यय

सोलापूर/प्रतिनिधी – जीवनात काहीजण नशिबावर हवाला ठेवून जगतात तर काहीजण प्रामाणिक कष्टातून नशीब व करिअर घडवितात.अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील गुंड परिवाराची ओळख हाडांच्या शिक्षकांची खाण म्हणून बनली आहे.याच कुटुंबातील आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांचा मुलगा व सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांचा नातू राजवर्धन गुंडने प्रामाणिक कष्ट,जिद्द व चिकाटीच्या जोरावर मेडिकलला सोलापूर येथे प्रवेश मिळवून स्वतःबरोबर कुटुंबीय,नातेवाईक व मित्रमंडळींची स्वप्नपूर्ती केली आहे त्यामुळे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी,जशी खाण तशी माती जणू याचाच प्रत्यय आल्याचे मत माढ्याचे उपक्रमशील शिक्षक विनोद परिचारक यांनी व्यक्त केले.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे राजवर्धन गुंड याचा ग्रामस्थ, शिक्षकवृंद,नातेवाईक व मित्रमंडळींच्या वतीने आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.

यावेळी दारफळचे आदर्श शिक्षक संतोष चव्हाण यांनी सांगितले की,आजच्या भयंकर स्पर्धेच्या युगात गुणवत्तेच्या जोरावर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे कठीण आहे परंतु ते कठीण काम राजवर्धन गुंडने प्रामाणिक कष्ट,शिक्षक व कुटुंबातील सदस्यांच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर सहज शक्य करून दाखवले आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.गुंड परिवारातील शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा तिसऱ्या पिढीने पुढे चालू ठेवला आहे. एक सुसंस्कृत,सुशिक्षित नोकरदारांचे कुटुंब म्हणून ओळख असलेल्या या कुटुंबातील इतर मुलांनीही हाच गुणवत्तेचा वारसा जपावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राजवर्धन गुंड,आजोबा आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, आजी शांताबाई गुंड,वडील आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,आई मेघना गुंड यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन आदर्श शिक्षक गोरखनाथ शेगर यांनी केले. आभार सहशिक्षक दिनेश गुंड यांनी मानले.

हेही वाचा- मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी – ए.पी.आय नेताजी बंडगर उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात गेस्ट लेक्चरचे आयोजन

श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

या विविध सत्काराच्या वेळी माढ्याचे डॉ.सुभाष पाटील, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,माजी सरपंच अनिलकुमार बरकडे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,विकासाधिकारी संजय शेळके,अमित चव्हाण, डॉ.आर्यन पाटील,नेताजी उबाळे,सुधीर गुंड,गोरखनाथ शेगर,दिनेश गुंड,विष्णू शेंडगे, भिवाजी जाधव,सौदागर खरात, कुणाल शेगर,शांताबाई गुंड, मेघना गुंड,सोनाली शेगर, उज्ज्वला जाधव,अबोली चव्हाण,मेघश्री गुंड,क्षितीजा गुंड,श्रद्धा शेगर,तेजश्री चव्हाण, विराज चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ,नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती.

फोटो ओळी – विठ्ठलवाडी ता.माढा येथे राजवर्धन गुंड याचा सत्कार करताना विनोद परिचारक,संतोष चव्हाण, गोरख शेगर,भिवाजी जाधव व इतर मान्यवर.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!