शैक्षणिकसोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील मूलं थोडक्यात वाचली; जेवायला बाहेर गेली अन स्लॅब कोसळला, सोलापूर जिल्ह्यातील घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील मूलं थोडक्यात वाचली; जेवायला बाहेर गेली अन स्लॅब कोसळला, सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर: सध्या जोरदार पावसाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय शाळा आगळगाव येथील शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळला असून शाळेतील विद्यार्थी-विद्यार्निनी जेवणासाठी बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ज्या वर्गातील स्लॅब कोसळला आहे, त्या वर्गात चौथीचा वर्ग भरत होता. शाळेचा स्लॅब कोसळल्यामुळे शाळेच्या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी आता पालकवर्गातून होऊ लागली आहे.


महाराष्ट्रात सध्या पावासाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेक भागातील इमारती, घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय शाळा आगळगाव प्राथमिक शाळेचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.
पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती लागली होती, ज्या स्लॅबमधून गळती लागली होती, त्याच स्लॅबचा काही भाग आज कोसळला. शाळेतील चौथीचे विद्यार्थी जेवणासाठी बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


स्लॅबचा भाग कोसळला तेव्हा शाळेत जेवणासाठी सुट्टी झाली होती, त्यामुळे विद्यार्थी बाहेर गेले होते, त्यामुळे स्लॅबचा भाग कोसळला पण कोणतीही अघटीत घटना घडली नाही.


आगळगाव शाळेची इमारत पूर्ण गळत असून याबाबत प्रशासनाकडे वेळीवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे आता तरी प्रशासनाने दखल घेवून भविष्यात होणारी हानी टाळावी अशी पालकांकडून मागणी करण्यात आली आहे.


जिल्हा परिषद केंद्रिय शाळा आगळगाव ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. या शाळेची इमारत 25 ते 30 वर्षाची असून स्लॅब, कॉलम, भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

litsbros

Comment here