झाडे लावून साजरा केला वाढदिवस

झाडे लावून साजरा केला वाढदिवस

करमाळा प्रतिनिधी – लाडक्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी चार वडाचे झाडे लावून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. मे महिन्यात तापमान 43 अंशाच्या पुढे गेले होते. पाऊस अनियमित पडतो. या पार्श्वभूमीवर वडशिवने येथील प्राध्यापक विजय जगदाळे यांनी त्यांच्या लाडका मुलगा राज याच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी वडशिवने येथील स्मशानभूमीत चार वडाच्या फांद्या लावून उत्साहात साजरा केला आहे.

गेले तीन वर्षापासून जगदाळे सर, नवनाथ लोंढे ,गोरख अप्पा जगदाळे, भाऊ अंधारे, शिवाजी पवार, दत्तात्रेय कामठे, राहुल जगदाळे ,अनंता शेळके ,आनंद शेलार इ. मित्र मंडळ झाडे लावून ती जगवत आहेत .तीन वर्षांपूर्वी वनंतर लावलेले झाडं आता जोमानं वाढत आहेत.हिरव्यागार झाडामुले स्मशानभूमीला शोभा येत आहे.आता त्या चार नवीन वडाच्या झाडाची भर पडली आहे. त्यामुळे वडशिवण्याच्या स्मशानभूमीचं सौंदर्य वाढत आहे.स्मशानभूमीतील वर,लिंब,पिपर इ.हिरवीगार झाडं हा गावात एक औसुक्याचा, आनंदाचा विषय झालेला आहे. याचे गावात चर्चा होत आहे.

हेही वाचा – उजनी जलाशयातील जलवाहतूक ठप्प; विद्यार्थी, नागरिकांचे हाल; नियम व अटी घालून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरापुढे एक एक तरी झाड लावलं तर पर्यावरणचा समतोल राखला जाईल .पाऊस वेळेवर पडेल, तापमानाचा नागरिकांना त्रास होणार काही, असं पर्यावरण प्रेम हे नवनाथ लोंढे यांनी वृक्षारोपणाच्या वेळेस उद्गार काढले. 

karmalamadhanews24: