युवक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे प्रा.नंदकिशोर वलटे यांचे व्याख्यान संपन्न

युवक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे प्रा.नंदकिशोर वलटे यांचे व्याख्यान संपन्न

करमाळा दि.13 युवक दिनानिमित्त करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. नंदकिशोर वलटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैली मध्ये तरुणांना प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

तरुणांनी आपले आदर्श समजून घेतले पाहिजेत व आपल्या देशाचा इतिहास वाचला पाहिजे.ही अपेक्षा बोलून दाखवली स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले व आजच्या तरुणांनी जागृत राहिले पाहिजे आपले ध्येय साध्य केले पाहिजे त्या करीत खूप कष्ट करा आणि यशस्वी व्हा हा कानमंत्र दिला. तसेच भारताची संस्कृती, इतिहास,आदर्श व्यक्ती याचे सप्रमाण दाखले दिले.

राष्ट्रीय छात्र सेनेत दाखल झालेल्या मुलामुलींना सैन्यात दाखल होऊन देश सेवा करा अशी अपेक्षा बोलून दाखवली या कार्यक्रमासाठी सिनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. साळुंखे सर,ज्युनियर विभागप्रमुख कर्नल संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा राख सर, मा.भुसारे सर तसेच नव्याने सैन्य दलात भरती झालेले जवान उपस्थित होते.

हेही वाचा – डोळे येणे म्हणजे काय? डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो? डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणं कोणती? त्यावर उपचार काय?

आई, वडील रोजंदारीवर कामाला, मुलीने पटकाविले ९६ टक्के गुण; अँड्रॉइड मोबाईल देउन सन्मान

या सर्व जवानांचा सत्कार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व्याख्यानाच्या शेवटी हरघर तिरंगा या संकल्पनेचे अनावरण केले आणि मेरी मीठी मेरा देश या नवीन संकल्पनेची विध्यार्थ्यांना माहिती माहीती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लेफ्टनंट गायकवाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन भुसारे सर यांनी मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line