हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम

हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम

!! देहदान हेच सर्वश्रेष्ठ दान..!! 
गेली दीड वर्ष झालं ही गोष्ट करायचा विचार केला होता तो आज कृतीत आणत आहे याचा खूप आनंद आहे…कोरोना काळात अनेक जवळची माणसं गेली तेव्हापासुन काही गोष्टींचा विचार करत आलो. देह, जन्म, जीवन व मृत्यू या गोष्टी समजून घेऊ लागलो आणि काही दिवसांनी देहदानाचा विचार मनात डोकावू लागला आणि तो आई वडिलांसमोर व्यक्त ही केला…साहजिकच आहे तो दोघांनाही सुरुवातीला अजिबात पटला नाही कारण आई आणि बापाचं काळीजच ते…!!!!

काही वेळ दोघांचा ओरडा खावा लागला पण हळूहळू काही गोष्टी बोलत गेलो आणि त्यातून माझा उद्देश वडिलांना समजत गेला आणि साधारणतः एक तासांनी वडिलांनी सहमती दर्शविली आणि मी ही करतो म्हणाले पण आई मात्र आम्हा दोघांवर रागावून घरात निघून गेली आई ची वेडी माया बाकी काय? मग तिला ही गोष्ट कशी सहन होणार…आणि जिणं आपल्याला नऊ महिने गर्भात वाढवलं, आपल्यासाठी मरण यातना सोसल्या व आपल्याला जन्म दिला आणि अजूनही हातावरील फोडाप्रमाणे जपत आहे म्हणल्यावर ती माझ्या या मताशी सहमत होणं हे कसं शक्य असणार….!


पण ही गोष्ट करण्यामागे माझं साधं आणि सोपं लॉजिक आहे. हा देह नश्र्वर आहे आणि मृत्यूही प्रत्येकाचा अटळ आहेच आणि तो कोणाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही आणि मृत्युनंतर प्रत्येक देहाची राखच होते मग तो देह कोणाचा का असेना…त्या व्यक्तीच्या विचारांचं व कर्तृत्वाचं अस्तित्व काही काळ जिवंत राहू शकतं पण त्या देहाचं अस्तित्व त्या राखेबरोबरच संपृष्टात येतं हे शाश्वत सत्य आहे मग मृत्युनंतर देहाची राख करण्यापेक्षा देहदान करून इतरांना जिवदान देणं लाखों,अनंत पटीने चांगलेच म्हणावे लागेल आणि या मध्ये आपला ही थोडा स्वार्थ आहेच की देहदान केल्यानंतर आपले अवयव ज्या माणसांना दिले जातील जोडले जातील त्या मध्ये आपलं अस्तित्वही वाढलेलं असेलच जे व्यर्थ जाणार नाही…
“शेवटी देहाची राख करून खाक होण्यापेक्षा;
देहदान करून इतरांमध्ये जिवंत राहणे चांगले!! ..

हेही वाचा – दिपक ओहोळ यांना क्रांतीसुर्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

140 कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याची वाशिंबे चौफूला दरम्यान 4 किमी साईड पट्टी उकरली

म्हणुन वार- सोमवार दिनांक ०६/०१/२०२५ रोजी मी माझ्या वाढदिवस निमित्त देहदान नोंदणीचा निर्णय घेतला आहे व पूर्ण केला आहे तो ही आनंदी मनाने व अभिमानाने..!!!!!
आणि सरतेशेवटी या निर्णयामध्ये आई बाप व सर्व कुटुंब सोबत आहे याचा जास्त आनंद आहे.
— सोमनाथ हनुमंत ओहोळ.
हिवरे, ता.करमाळा जि. सोलापूर
मो. 9527268106.

karmalamadhanews24: