यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

केत्तूर (अभय माने ) : करमाळा येथे लोकशिक्षिका स्व. लिलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पधेंप्रसंगी प्रतीपादन.
प्रारंभी लोकशिक्षिका स्व. लिलाताई दिवेकर यांच्या प्रतिमापूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात प्रा.करे – पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास आपल्या वक्तृत्वाच्या बळावर जगभरात लौकीक मिळवतील. यासाठी सोलापूर जिल्हा इंग्लीश टीचर्स असोसिएशनला मार्गदर्शन व संपूर्ण आर्थिक सहकार्य करत विद्यार्थीहीत जोपासण्याचा संस्था प्रयत्न करत आहे.

करमाळा येथे प्रती वर्षी 26 जुलै हा लोकशिक्षीका लिलाताई दिवेकर यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आपले अवघे आयुष्य वाहिलेल्या थोर शिक्षिका व समाजसेविका स्व. लिलाताई दिवेकर यांच्या स्मृती विविध उपक्रमांनी जपण्याचा यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश भाऊ करे- पाटील प्रयत्न करत आहेत.

या स्मृतीदिनाचे औचित्य साधत यशकल्याणी सेवाभावी संस्था ,शिक्षण विभाग जि.प. सोलापूर व जिल्हा इंग्लीश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हयातील अकरा तालुक्यातून सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या इंग्रजी वक्तृत्वाची चूणूक दाखवली.
एकूण 35 हजार रू. रोख रकमेची पारितोषीके व प्रत्येकाला सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून विजेत्या स्पर्धकांचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.

जिल्हास्तरीय विजेते पुढील प्रमाणे

पाचवी / सहावी गट
प्रथम – कु.स्वरा प्रविण कुलकर्णी (साडे हायस्कूल साडे )
द्वितीय – अल्फीया निसार पठाण ( जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ) तृतीय- विश्वब्रम्ह होटगे ( जि.प. प्रा. शाळा कोरसे गाव अक्कलकोट ) ,उत्तेजनार्थ – अनुष्का गणेश सुतार -(.न्यु इंग्लीश स्कूल मंगळवेढा ), उत्तेजनार्थ – अतीफ आदमशहा मकानदार (यशवंत विद्या. औराद, दक्षिण सोलापूर )

सातवी / आठवी गट

प्रथम क्रमांक – सानवी अतुल पोळ ( क. अण्णासाहेब जगताप वि.करमाळा ), द्वितीय क्रमांक – गार्गी गणेश वाघमारे (जि.प. प्रा. शाळा पोखरापूर मोहोळ ) तृतीय क्रमांक – फैजान निसार शेख ( सिल्वर ज्युबीली हायस्कूल बार्शी ) उत्तेजनार्थ – राधीका नितीन गोरे ( कवठेकर प्रशाला , पंढरपूर ) उत्तेजनार्थ – उत्कर्ष मारूती माळी ( के एस बी पाटील विद्या मोहोळ.

नववी / दहावी गट

प्रथम क्रमांक – प्राची नंदकुमार वाघमारे ( यशवंतराव चव्हाण वि. फळवणी माळशिरस ) द्वितीय क्रमांक – अक्षरा श्रीशैल म्हमाणे ( ग्रामीण विद्या. चपळगाव अक्कलकोट ) तृतीय क्रमांक -सार्थक सिध्देश्वर लेंगरे ( डीएचके प्रशाला पंढरपूर ) उत्तेजनार्थ : अक्षरा सचिन बरडे ( नूतन विद्यालय, कुर्डुवाडी ) उत्तेजनार्थ : आर्या अभिजित काळे ( के.एस.बी. पाटील विद्या अनगर )

हेही वाचा – वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील , माध्य. शिक्षणाधिकारी सचिन जगताप सो. गटविकास अधिकारी मनोज राऊत , गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, प्रा गुरूनाथ मुचंडे , प्रा अशपाक काझी , जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड ,सचिव प्रा.धनाजी राऊत, उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब दाढे, उपाध्यक्ष प्रा. शशीकांत चंदनशिवे करमाळा, पं.समिती समन्वयक मा.रेवन्नाथ आदलिंग तालुका अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, सचिव प्रा. गोपाळराव तकीक यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे , प्रा.मारूती जाधव प्रा.सुखदेव गिलबीले यांनी तर प्रा.सुहास गलांडे यांनी आभार मानले.

karmalamadhanews24: