जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान

जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान


करमाळा(प्रतिनिधी);
लेखक जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाला मानाचा लोकराजा शाहू महाराज पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. इचलकरंजी येथे झालेल्या ११ व्या भव्य शाहू महोत्सवात मा. उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते यांच्या हस्ते व शाहू महोत्सवाचे आयोजक अरुण कांबळे, मुख्याध्यापिका मंजुषा राऊळ मॅडम, सचिव अक्षरा कांबळे, कस्टम ऑफिसर मदन पवार आदींच्या उपस्थितीत व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मोटिव्हेशनल पुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथे प्रकाशित होणारे हे पहिले मराठी पुस्तक आहे. तर केवळ बारा महिन्यात पंचवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्याने हे पुस्तक साहित्य विश्वात सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.


यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते म्हणाले की, ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे जबरदस्त पुस्तक आहे. अशा पुस्तकाला लोकराजा शाहू महाराजांच्या नावे पुरस्कार देताना आम्हा कोल्हापूरकरांना विशेष आनंद वाटतो.
या पुरस्काराबद्दल लेखक जगदीश ओहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


हेही वाचा – पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

अनिल झोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाला आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. परंतु परवा कोल्हापूरच्या मातीमध्ये वस्त्रनगरी इचलकरंजी येथे 11 व्या #शाहू_महोत्सवात “मानाचा लोकराजा शाहू 2024” हा पुरस्कार या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. ही केलेल्या कामाचे सार्थक झालं हे सांगणारी आहे.
ज्या शाहू महाराजांनी शिक्षणासाठी बाबासाहेबांच्या पाठीवर आधाराची थाप दिली, त्याच शाहू महाराजांच्या भूमीतून या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचं कौतुक व्हावं आणि त्या पुस्तकावर कौतुकाची मोहर शाहू महाराजांच्या भूमीतून उमटावी ही पुढील कार्याला बळ देणारी गोष्ट आहे.
शाहू महोत्सवाचे आयोजक व कोल्हापूरकरांचा मी खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद
– जगदीश ओहोळ, लेखक व व्याख्याते

karmalamadhanews24: