लेखक जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे होणार प्रकाशन: कॅबिनेट मंत्री उदय सामंत, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थिती आंबडावे गावी रंगणार सोहळा !
करमाळा(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक अल्पावधीतच जगप्रसिद्ध झाले व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेण्यात आली. नुकताच या पुस्तकाला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने मानाचा ‘नेल्सन मंडेला’ पुरस्कारही देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अगदी कमी कालावधीमध्ये विक्रमी प्रतींची विक्री झालेली आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ ठरले आहे.
या जग बदलणारा बापमाणस पुस्तकाच्या इतर भाषांमध्येही आवृत्ती याव्यात अशी अनेक वाचकांकडून मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन भीमजयंती दिनी म्हणजेच 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबाडवे, तालुका मांडणगड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कॅबिनेट उद्योग मंत्री माननीय उदय सामंत, रिपब्लिकन सरसेनापती आनंदराज आंबेडकर गृहराज्यमंत्री योगेश कदम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे.
अशी माहिती पुस्तकाच्या प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमांना दिली.
उन्हाळ्यापूर्वीच उजनीत पाण्याचा खडखडाट
यावेळी बोलताना पुस्तकाचे लेखक व सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ म्हणाले की हिंदी आवृत्ती निघाल्यामुळे उत्तर भारतामध्ये व हिंदी बहुलप्रदेशामध्ये या पुस्तकातील विचार लोकांपर्यंत पोहोचतील. हिंदी भागातील अनेक वाचकांनी आजवर या पुस्तकाच्या हिंदी आवृत्ती बद्दल विचारणा केली होती व ते स्वप्न सत्यात येत आहे. तसेच या पुस्तकाचे प्रकाशन बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी शासकीय पातळीवर होत असलेल्या समारंभामध्ये होत आहे, याचा विशेष आनंद वाटतो. मराठीला ज्याप्रमाणे वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद हिंदी आवृत्तीलाही भेटेल अशी खात्री आहे. लवकरच इंग्रजी व इतर भाषांतील आवृत्ती येतील.