महाराष्ट्रशेती - व्यापार

राज्यात पावसाचा अंदाज, वाचा कुठे आणि कधी पडणार पाऊस?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यात पावसाचा अंदाज, वाचा कुठे आणि कधी पडणार पाऊस?

राज्यात सातत्यानं हवामानत बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच याचा शेती पिकांवर  देखील परिणाम होताना दिसत आहे. अशातच हवामान विभागाकडून  जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (आणि विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करुन दिली आहे.


सध्या राज्यात थंडीचा  कडाका सुरु आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे. याचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत आहे. यामुळे वाहनं चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. म्हणजेच, राज्यातील वातावरणात सातत्यानं चढ-उताराचा खेळ सुरु आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता हवामान विभागानं मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण या पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पिकांवर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्यची शक्यता आहे.
अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत.  उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 जानेवारीनंतर म्हणजे आजपासून येथील हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

litsbros

Comment here