वाशिंबे येथे जे.के.फाऊंडेशनचे जनआरोग्य शिबीर संपन्न; ४२० गरजुवंताचा सहभाग
वाशिंबे प्रतिनिधी :- ‘ जनसेवा ही ईश्वर सेवा ‘ मानुन निस्वार्थी भावनेतून जे.के.फाऊंडेशन हे मोफत सेवा देत असून यामध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर ,मोफत नेत्र मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर,वृक्षारोपण,शालेय विद्यार्थांना बक्षिस वितरण करणे,ऊस तोडणी मजुरांना कपडे वाटप करणे,लागेल त्याला मोफत रक्त पुरवठा,शालेय विद्यार्थांची हिमोग्लोबीन चाचणी,वृद्धांना आधार काठीचे वाटप,आरोग्य तपासणी शिबीर असे सामाज उपयोगी महान कार्य श्री.अमोल भोईटे हे युवक मित्रांच्या मदतीने करीत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिंबे जि.प.शाळा येथे स्व.देशभक्त जगन्नाथ कृष्णा भोईटे चॅरिटेबल ट्रस्ट वाशिंबे व रेड सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.डॉ.संजय तास्केकर व टीम (मुंबई) यांनी महा जन आरोग्य शिबिरात वाशिंबे पंचकोशीतील ३७४ लोकांची आरोग्य तपासणी केली.
बुधराणी हॉस्पिटल पुणे टीमने मोतीबिंदू पेशंट डोळे तपासणी केली असता ४६ पेशंट निघाले. फाऊंडेशनच्या सामाजिक कामाचे अनेकांनी कौतुक केले.हा कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित संपन्न झाला.