वारीच्या नावाखाली सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करू; कुणी दिला इशारा? वाचा सविस्तर..

वारीच्या नावाखाली सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करू; कुणी दिला इशारा? वाचा सविस्तर..

करमाळा(प्रतिनिधी); सीना कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सीना कोळेगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग यांना एका निवेदनाद्वारे केली आहे

निळ यांनी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सीना कोळगाव प्रकल्पा मध्ये आज रोजी अत्यअल्प प्रमाणात पाणी साठा आहे,व पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये आहे.

तसेच आम्ही धरणग्रस्त बांधवांनी आमची घरे, दारे जमीन जुमला सर्व काही धरणासाठी देऊन आम्ही धरणग्रस्त बांधवांनी त्याग केला आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावर्षी अजून ही पाऊस पडला नाही म्हणून आमची उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत, पाणी पातळी खाली गेल्या मुळे आम्हाला वारंवार केबल, पाईप, सातत्याने वाढवावे लागेल आहेत.

तोच खर्च आम्हाला न झेपणारा झालेला आहे. आमच्या करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह) आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे.

आपण आमचा अंत पाहू नये.व विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही. कृपया आपण पाणी सोडल्यास आम्हा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपणच जबाबदार आहात याची नोंद घ्यावी असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

हेही वाचा – आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठ्ठीचार्जचा करमाळा भाविक वारकरी मंडळ कडून जाहिर निषेध: जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदन

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी व वाहनांचा होतोय निवडणुकीत गैरवापर; मकाईच्या ‘या’ माजी संचालकाने केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी
मा. कार्यकारी अभियंता साहेब सीना कोळगाव प्रकल्प विभाग परंडा. पोलीस निरीक्षक परांडा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना पाठवले आहेत.

karmalamadhanews24: