करमाळाक्राइम

मॉर्निंग वॉक करणाऱ्या हायस्कूल शिपायाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू; करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मॉर्निंग वॉक करणाऱ्या हायस्कूल शिपायाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू; करमाळा तालुक्यातील घटना

उमरड (प्रतिनिधी); दिनांक 23/05/2021 रोजी वडशिवणे येथील अजित पवार विद्यालयाचे येथील शिपाई विजय बाबू काकडे (वय 48) हे पहाटे वडशिवने-केम रोडवर मॉर्निंग करता गेले होते. यावेळी गावातील स्मशानभूमीजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यात सोमनाथ निलू लोंढे यांनी तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, पहाटे 4.15 ते 5 च्या दरम्यान वडशिवणे गावातील स्मशानभूमीजवळ अज्ञात वाहनाने व आज्ञात चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून गावातील बाबू काकडे यांच्या अंगावर वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहन व अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तळपे हे करत आहेत.

हेही वाचा- करमाळा येथे झालेल्या अनैतिक संबंधातून खून प्रकरणी एकास जामीन

सकारात्मक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही; सर्वत्र होत आहे कौतुक

litsbros

Comment here