व्यवहारात दहा रुपयांच्या नोटा गायब तर नाण्यांचा खळखळाट!

व्यवहारात दहा रुपयांच्या नोटा गायब तर नाण्यांचा खळखळाट!

केत्तूर ( अभय माने) लहान व्यापाऱ्यांचा उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे मात्र, हंगामाच्या तोंडावरील बाजारपेठेतील दहा रुपयांच्या नोटा गायब झालेल्या आहेत तर काही दिवसापूर्वी चलनात असूनही घेतली न जाणारी दहा रुपयाची डॉलर (नाणेही) अल्प प्रमाणात असल्याने लहान व्यापाऱ्यांना वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.सध्या अनेक व्यवहार हे ऑनलाइन होत असली तरी, अनेक छोट्या छोट्या व्यवहारांमध्ये या दहा रुपयांच्या नोटांचा वापर होतो याची टंचाई निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचे ग्राहकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी हमरी – तुमरीही होत आहे.

बँकेत गेले तरी दहा रुपयांच्या नोटा मागूनही मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तरी त्या जीर्ण झालेल्या असतात या नोटांची कृत्रिम टंचाई आहे ? की त्यांनी नोटा बाजारात उपलब्ध नाहीत ? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा – श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

गेल्या वर्षभरापासून दहा रुपयाच्या चलणी नोटा मिळत नसल्याने व्यापारी वर्ग व छोटे व्यावसायिक मात्र त्रस्त झाले आहेत. मोठे व्यापारी मात्र कमिशन घेऊन दहा रुपयाच्या नोटा उपलब्ध करीत आहेत यावर लक्ष देऊन रिझर्व बँकेने दहा रुपयाच्या नोटांची छपाई करावी अशी मागणी ग्राहक व छोट्या व्यापारी वर्गातून होत आहे.

karmalamadhanews24: