करमाळा येथे शतकपार झालेल्या मतदारांचे मतदान
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील १०४ वर्षांचा योध्दा मा केरु(नाना) विठोबा कोकरे यांनी आपल्या नातू तथा पश्चिम महाराष्ट्राचे वेतन पडताळणी अधिकारी दयानंद धुळाभाऊ कोकरे यांच्यासमवेत कुगाव (ता करमाळा) येथे 244 करमाळा विधानसभा मतदारसंघात 2024 च्या विधानसभेसाठी मतदान केले.
हेही वाचा – करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात करा; माजी नगरसेविका सविता कांबळे
राजकीय वातावरण तापले : राजकीय चर्चांना ऊत
लोकशाही बळकट करण्यासाठी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली लोकसभा 1952 पासुन आज पर्यंतच्या सर्वच लोकसभेसाठी तर मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून केरु (नाना) कोकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
गोयेगाव येथे श्रीमती राधाबाई शंकर शेंडगे ( वय 105) यांनी मतदानाचा हक्क बजावला.