सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा : मतदारांचे मोबाईल होऊ लागले हँग

सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा : मतदारांचे मोबाईल होऊ लागले हँग

केत्तूर (अभय माने) 244 करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ उमेदवारी माघारीनंतर 15 उमेदवार आपले नशीब आजमावत असलेतरी येथे चौरंगी सामना रंगला आहे.उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले असून मतदारसंघात जवळपास 144 गावे तसेच वाड्या-वस्तीवर कमी कालावधीत पोहोचण्यासाठी उमेदवार पराकाष्टचे प्रयत्न करताना दमछक होत आहे.

मात्र यामध्ये सोशल मीडियावरील प्रचाराने धुरळा उडवला असून,यामुळे मोबाईल मात्र हँग होऊ लागले आहेत. त्यामुळे मोबाईल धारक मेसेज न पाहताच ग्रुपवर आलेले सर्व मेसेज न वाचवा ऑल डिलीट करत आहेत.

हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील करमाळा तालुक्यातील डिकसळ चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी

व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्रामवर प्रचाराचे फोटो,जुने नवे व्हिडिओ,रिंल,स्थानिक युट्युब चॅनेल वरील नागरिकांच्या प्रतिक्रिया,न्यूज चॅनलवरील बाईट जोरदारपणे व्हायरल होत आहेत. मात्र यांच्या सोशल मीडियावर होणाऱ्या पत्येकवेलच्या अपडेटमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोबाईल ह्यांग होऊ लागले आहेत व रोज मोबाईलमध्ये चेक करून क्लिअर चाट मारावे लागत आहे तेव्हा कुठे मोबाईल सुरळीत चालत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line