विठ्ठलवाडीचे सुपुत्र राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

विठ्ठलवाडीचे सुपुत्र राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

माढा / प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सुपुत्र आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना खैराव येथील श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा सन -2024 चा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार 20 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात 8 मार्च रोजी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा संमेलनाध्यक्ष डॉ.शिवाजी शिंदे व चित्रपट निर्माते मनोज कदम यांच्या हस्ते समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,शाल,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पत्रकार राजेंद्र गुंड यांनी मागील नऊ वर्षांच्या कालावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक,कृषी,औद्योगिक, राजकीय,आरोग्य,क्रिडा, पर्यावरण आदी विषयांवर वस्तुनिष्ठ व परखडपणे लेखन केले आहे.त्यांच्या लेखनीच्या माध्यमातून अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. त्यांच्या लेखनीमुळे माढा तालुक्याच्या पूर्व भागातील मानेगाव गटातील विविध गावांतील अनेक चांगल्या व महत्वपूर्ण बाबींना प्रसिद्धी मिळाली आहे.तालुक्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख व नावलौकिक निर्माण झाला आहे.या बाबींची योग्य दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.यापूर्वीही त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा – रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

शासनाचे अर्थसहाय्य मिळवून देणारी प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी – प्रियांका गायकवाड

यावेळी साहित्यिक प्रकाश गव्हाणे,जलतज्ञ अनिल पाटील, डॉ.स्मिता पाटील,प्राचार्य सुभाष नागटिळक,प्रा.अरुण नवले, प्रतापराव नागटिळक, विलासराव देशमुख,कवी फुलचंद नागटिळक,सरपंच रमेश भोईटे,उपसरपंच पंडित पाटील,सुजित परबत,अरविंद मोटे,विलास क्षीरसागर,अमोल थिटे,ग्रामसेविका रेश्मा पाटील, मैनाबाई भांगे,गोरक्षनाथ भांगे,गणपत साठे,मार्तंड जगताप,पिंटू नागटिळक, रामचंद्र भांगे,प्रविण लटके, शिवाजी भोगे,महेश नागटिळक, ज्ञानेश्वर पाटील,शरद नागटिळक,प्रवीण क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी-खैराव ता.माढा येथे ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ.शिवाजी शिंदे व चित्रपट निर्माते मनोज कदम यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार स्वीकारताना राजेंद्र गुंड बाजूला इतर मान्यवर.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line