माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

विठ्ठलवाडीतील मेघश्री गुंड हिचा बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विठ्ठलवाडीतील मेघश्री गुंड हिचा बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार

माढा / प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी मेघश्री राजेंद्र गुंड हिने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचा सत्कार अंजनगाव खेलोबाचे उपसरपंच भागवत चौगुले व लोंढेवाडीचे कवी बाबासाहेब लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कवी बाबासाहेब लोंढे म्हणाले की,विठ्ठलवाडी येथील प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा चांगला आहे.याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे शालेय व सहशालेय उपक्रम राबविले जातात.विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,प्रदिप चौगुले,बतुवेल रावडे,राजेंद्र गुंड,सौदागर गव्हाणे,नेताजी उबाळे, सतीश गुंड,विशाल नाईक,शांताबाई गुंड,मेघना गुंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा – माढा येथील मुलींच्या शाळेत किशोरी मेळावा उत्साहात साजरा

अखेर केमकरांच्या संघर्षाला न्याय मिळाला; लाखोंची तिकिटे, आंदोलने, पाठपुरावा यानंतर महत्त्वाच्या ‘या’ दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना केम स्थानकावर थांबा मिळाला

फोटो ओळी – विठ्ठलवाडी ता.माढा येथे मेघश्री गुंड हिचा सत्कार करताना उपसरपंच भागवत चौगुले, कवी बाबासाहेब लोंढे, प्रदिप चौगुले व इतर मान्यवर

litsbros

Comment here