विठ्ठलवाडी येथील मानसी शेंडगे बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम ; शिवम गुंड जिल्ह्यात तृतीय
माढा / प्रतिनिधी –जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोलापूर येथे बुधवारी 11 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील दोन खेळाडूंनी विशेष चमकदार कामगिरी केली आहे.या स्पर्धेत मानसी मारुती शेंडगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून शिवम सुधीर गुंड याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी मानसी मारुती शेंडगे हिने मुलींच्या मोठ्या गटात बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.विठ्ठलवाडी सारख्या एका छोट्याशा ग्रामीण भागातील खेळाडूने कोठेही खाजगी तास न लावता भरपूर सराव चिकाटीच्या जोरात हे उल्लेखनीय यश संपादित केले आहे त्याबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.तिला सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते,अंकुश गवळी,गोरखनाथ शेगर,विजय काळे, भारत कदम,संजय सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
विठ्ठलवाडी येथील व सध्या माढा येथील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी शिवम सुधीर गुंड याने मुलांच्या मोठ्या गटात बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्याला सहशिक्षक सुधीर गुंड व सहशिक्षिका माधुरी गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.
विठ्ठलवाडीतील मेघश्री गुंड हिचा बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार
या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे,बीडीओ डॉ.संताजी पाटील,विस्तार अधिकारी विकास यादव,केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, मुख्याध्यापक नागेश खेडकर, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेणुका जाधव,उपाध्यक्षा शीतल गुंड यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकांनी केले आहे.
Comment here