विठ्ठलवाडीच्या गुंड परिवाराने कष्ट व गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठले – प्रा.डॉ.नेताजी कोकाटे
राजवर्धन गुंड याचा मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाबद्दल सत्कार
सोलापूर/प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या शिक्षण क्षेत्राचे मुख्य आधारस्तंभ तथा सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांचे बहुमोल मार्गदर्शन,शिस्त व संस्काराच्या जोरावर गुंड परिवाराच्या दुसऱ्या पिढीतील 8 जण गुणवत्तेच्या जोरावर शिक्षक झाले.आता तिसऱ्या पिढीतील एकजण अभियंता, एकजण शिक्षक व एकजण राजवर्धनच्या रुपाने डॉक्टर बनणार आहे.हे उल्लेखनीय यश त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, प्रामाणिक कष्ट,जिद्द, चिकाटीच्या जोरावर प्राप्त केले आहे.या कुटुंबातील सदस्यांनी विठ्ठलवाडीचा नावलौकिक तर वाढविला आहेच शिवाय त्यांनी यशाचे शिखर गाठले असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नेताजी कोकाटे यांनी केले आहे.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे राजवर्धन गुंड यांचा गुणवत्तेच्या जोरावर सोलापूरच्या अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.
यावेळी राजवर्धन राजेंद्र गुंड याचा सत्कार प्रा.डॉ.नेताजी कोकाटे,आदर्श शिक्षक राजाभाऊ कदम,माढ्याचे सहशिक्षक सुभाष वाघमारे, उपळाई खुर्दचे रावसाहेब पालकर,विमा प्रतिनिधी दिपक जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आदर्श शिक्षक राजाभाऊ कदम यांनी सांगितले की,राजवर्धन गुंडच्या रूपाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माझा विद्यार्थी डॉक्टर बनणार आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद व मनस्वी आनंद देणारी आहे.आमचे मार्गदर्शक आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न राजवर्धनने प्रामाणिक कष्टाच्या जोरावर साकार केले आहे.त्याने यशाचा हा चढता आलेख असाच पुढे सुरू ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना राजवर्धन गुंडने सांगितले की, कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास, प्रामाणिक कष्ट व जिद्द असावी लागतेच परंतु त्याचबरोबर शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि संगतगुणही तितकाच महत्त्वाचा घटक असतो. सध्याच्या पिढीने सोशल मीडियाचा गरजेपुरताच वापर करावा.आई-वडिलांचे व स्वतःचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – तब्बल चाळीस वर्षा नंतर केत्तूर नं २ येथे येणाऱ्या एसटी बस पाटीचे नामकरण
सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड
यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,मेघना गुंड,स्वाती कोकाटे,राजाभाऊ कदम, हरीदिनी कदम,नेताजी उबाळे, समाधान कोकाटे,पूजा कोकाटे, मेघश्री गुंड, विमा प्रतिनिधी दिपक जगताप,सुभाष वाघमारे, नागटिळक सर,रावसाहेब पालकर,सिद्धेश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
फोटो ओळी – विठ्ठलवाडी ता.माढा येथे राजवर्धन गुंड याचा सत्कार करताना प्रा.डॉ. नेताजी कोकाटे,राजाभाऊ कदम,समाधान कोकाटे,बाळू गुंड व इतर मान्यवर.