माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

विठ्ठलवाडी येथील आनंद बाजाराला ग्रामस्थ व महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद बाजारात झाली सुमारे 22 हजारांची आर्थिक उलाढाल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विठ्ठलवाडी येथील आनंद बाजाराला ग्रामस्थ व महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

बाजारात झाली सुमारे 22 हजारांची आर्थिक उलाढाल

माढा / प्रतिनिधी – शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान देण्याच्या उद्देशाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आनंदी बाजार भरू लागले असून विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या आनंद बाजाराला ग्रामस्थ व महिला आणि पालकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या बाजारात सुमारे 22 हजारांची आर्थिक उलाढाल झाल्याचे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांनी सांगितले आहे.

या आनंदी बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल गुंड यांच्या हस्ते व सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान,देवाण-घेवाण, मोजमाप,खरेदी-विक्रीचे ज्ञान व कौशल्य आत्मसात व्हावे या हेतूने या बाजारात स्टेशनरी दुकान, इडली सांबर,पाणीपुरी,ओली व सुखी भेळ, वडापाव, पावभाजी,गरमागरम चहा- कॉफी व भजी,मिसळपाव, पालेभाज्या व फळे,डिंकलाडू,बेसण लाडू,शेंगदाणा लाडू,शेंगदाणा चिक्की, मनुके,खारे शेंगदाणे,फरसाणा आदी खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. पालक,महिला व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी विद्यार्थ्यांना जवळपास 70 ते 75 स्टॉल मांडले होते.

हेही वाचा – हिमाचल प्रदेश सरकारकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू;महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार या निर्णयाबाबत मागे का ? शिक्षक व कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

महिला सक्षमीकरणासाठीचे प्रमोदिनी लांडगे यांचे कार्य कौतुकास्पद – आमदार बबनराव शिंदे मानेगाव येथे महिलांचा स्नेह मेळावा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न

यावेळी केंद्रप्रमुख विष्णू बोबडे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,अंकुश गवळी,विजय काळे,भारत कदम, गोरखनाथ शेगर,संजय सोनवणे, सुप्रिया ताकभाते,इंदूमती कदम,मेघना गुंड,स्वाती उबाळे, कांताबाई गुंड,माधुरी गुंड,सोनाली शेगर,पूजा कोकाटे,माधुरी सस्ते,तेजश्री गुंड,राधा खैरे,सुप्रिया शेंडगे, नेहा उबाळे, राणी काशीद, कैलास सस्ते,अशोक जाधव,दत्तात्रय खैरे,दत्तात्रय काशीद,गोपीनाथ मस्के, कैलास खैरे,वैजिनाथ जाधव,बबन उबाळे, शिरीष मस्के,हनुमंत मस्के, मुकुंद खैरे,नितीन शिंगाडे,अमोल गव्हाणे, विष्णू खैरे,महादेव जाधव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी – विठ्ठलवाडी ता.माढा येथील प्राथमिक शाळेत भरवलेल्या आनंदी बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे दृश्य.

litsbros

Comment here