करमाळाताज्या घडामोडी

पैशासाठी तिखट मिर्ची खाणाऱ्या निष्पाप मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पैशासाठी तिखट मिर्ची खाणाऱ्या निष्पाप मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

उमरड(नंदकिशोर वलटे): केवळ पंधरा सेकंदाच्या व्हिडीओ सर्वांची मने हेलावतो आणि माणसाला अंतर्मुख करायला भाग पडतो.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे एक निष्पाप मुलगी कोणीतरी दिलेली तिखट मिरची अगदी सहज चवळीच्या शेंगे प्रमाणे खाताना दिसते तिथं पर्यंत ठीक परंतु ते कृत्य केल्यानंतर एक हात (व्यक्ती) तीला काही पैसे देतो आणि मुलगी आनंदाने ते पैसे कोणाला तरी दाखवते तेव्हा कॅमेरा क्लोज होतो आणि तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू दिसतात ते पण पैसे मिळाल्याच्या हास्यासह.

हे हृदयद्रावक चित्र पाहून प्रत्येकजण अंतर्मुख होतो. विचार करतो आणि आपली समाज मानसिकता तपासू लागतो.
खरंच समाजात असे अनेक जीव आहेत की स्वतःच्या आर्थिक, मानसिक व शारीरिक फायद्यासाठी लहान मुलांना वाटेल तसे वापरून घेतात ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपल्या हितासाठी वंचित घटकांचा असा अमानुष वापर हा मोठा गुन्हा आहे. हाच धडा या व्हिडीओ ने शिकवला म्हणून तर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हे मात्र खरे.

सिनेकाठच्या गावांत बागल गटाला खिंडार, हिवरे गावच्या माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा आ.संजय मामा शिंदे गटात जाहीर प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेवी यात्रेबाबत झाला ‘ हा ‘ महत्त्वाचा निर्णय

litsbros

Comment here