ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पटोलेंच्या राजीनाम्याननंतर आता ‘यांची’ होऊ शकते विधानसभा अध्यक्षपदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पटोलेंच्या राजीनाम्याननंतर आता ‘यांची’ होऊ शकते विधानसभा अध्यक्षपदी निवड

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिला आहे. मात्र विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. नाना पटोलेंच्या जागी काँग्रेसच्या नेत्याची निवड होणार असल्याने नेमकं कोणाला विधानसभा अध्यक्षपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून सुरेश वारपूडकर, अमीन पटेल आणि आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी हा नाव चर्चेत आहेत. मात्र यामधील केसी पाडवी हे नाव आघाडीवर असल्याची माहिती समजत आहे.

केसी पाडवी हे अक्कलकुव्या मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदाचा कारभार सांभाळला आहे.

हेही वाचा-मोटर सायकल चोरी करणारे आरोपी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात;केला लाखो किमतीचा माल हस्तगत

महाराष्ट्रातील मतदारांना आता मिळणार मतपत्रिकेचा पर्याय:विधानसभा अध्यक्ष

त्यामुळे काँग्रेस कोणत्या नेत्याला विधानसभा अध्यक्षपद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरमयान, नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यपद पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा काँग्रेसने केली नाही.

litsbros

Comment here