विचारांच्या पल्याड …….. एक भावस्पर्शी लेख
*****************************
अन…काही माणसं शिकली म्हणजे शहाणी असतात ही एवढा मोठा गैरसमज डोक्यातून काढून टाकू म्हणजे शिकायचं नाही असं पण नाही कारण शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिलं की तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणजे फार शिकलं ते फार मोठं झालं असं आहे आणि जे शिकले नाही ते गाढव आहेत असं पण नाही हे पण डोक्यातून काढून टाकू उलट जी माणसं शिकली नाहीत ते आपल्या सगळ्या भावांची अन त्यांच्या पोरांची लग्न होईस्तोवर एकत्र राहिले ही न शिकलेल्या ची ताकत होती आपल्याला माहित आहे आपल्या बहिणाबाई शाळेत गेल्या नव्हत्या पण त्यांच्या काव्यामध्ये काय तो ग्रामीण पणा आणि आत्मीयता खच्चून भरलेली होती आज कालचं आपल्या डोळ्यासमोरच एक जिवंत उदाहरण घेऊ एक समजदार पाहुण्यांनी मुक्कामाला राहिल्यावर विचारलं तुझे आई वडील कुठे आहेत तो म्हणला धाकट्याकडे आहेत तर तो म्हणला कारं ssss तुझ्या घरात काय साप… इच्चू निघतात काय अरे तुला शासनाचा पन्नास हजार पगार हाय तरीपण म्हाताऱ्याला संडासला रानात येड्या बाभळीत संडासला फर्लँगभर लांब पाठवतोय का तर म्हणे माझ्या मिसेसच आणि म्हाताऱ्याचं पटत नाही आता काय म्हणावे ह्याला आता ह्याची बायको आली आणि उंच टाचांचे सँडल घातलेली आणि थोडेफार शिकलेली आली आणि म्हणती मला कामाचा लोड पडतोय यांना धाकट्या घरी पाठवा आरं त्याच म्हातारीने तुला लहानपणीच बाळूत्यात जर दाबला असता तर पुढचं काहीच नव्हतं.
तुझी बायको बी नव्हती आणि तुझी जिंदगी पण नव्हती तुझ्या आईमुळे घडले म्हणून म्हणत्यात आई बाप असता घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी तरी एकदा सहज त्याला विचारलं आईबाप काय तुझ्याकडे असतात काय तर तो म्हणतो कसा आईबाप माझ्याकडे नसतात पण मीच आईबापाकडे असतो
एक अडाणी व्हतं त्याला समद गाव विचारायचं तू तुरीवर कोणते औषध फवारतोस त्याला प्रश्न पडला काय उत्तर द्यावं कारण या वर्षी त्याला पावणेतीनशे क्विंटल तुरी झाल्या पाचशे तीस क्विंटल कापूस झाला आणि बाजूला होतं त्याची दोन्ही पोरं एग्रीकल्चर झालेली तरी पन्नास औषध मारुन पण त्याचा काय मेळ जमू द्यायना शिक्षणात एवढं काही नसतं अनुभव हा महत्त्वाचा असतो आता एवढ्यात एक पश्चिम महाराष्ट्राची एक मा.राहीबाई पोपेरे नावाची माऊली आहे आता एवढ्यात तिला* बीज माता * पुरस्कार मिळालाय सगळे कृषी विद्यापीठाचे पदाधिकारी त्यांच्या घरी येऊन त्याच्याबद्दल माहिती घेतात त्यांनी अनेक धान्याचे अनेक वान तांदळाच्या 104 जाती राही बाईच्या घरात असणाऱ्या सीड बँकेमध्ये 52 पिकाचे 114 गावरान वान आहेत या बाईच्या लक्षात आलं तिच्या भागात कुपोषणाचे प्रमाण वाढलेलं होतं ते सगळं हायब्रीड आणि रासायनिक प्रक्रिया करून वाढवलेले पीक आहे आणि वाढवलेल्या यामुळे झाले हिने काय केल खत पाणी दिल्याशिवाय पीक वाढू शकत नाही सांगायचे एवढेच की माणसाचं डोकं आणि आचरण सुपीक असावं लागतं एकदा काय झालं एकानं पाहिलं की 96 वी पुण्यतिथी साजरी करतात मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली.
आमच्यात का नाही साजरी करत कमीत कमी 96 च्या आसपास ची तरी पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे कारण 96 पर्यंत पुण्यतिथी साजरी करू तर मधेच ही जातंय मग त्याचा पोरगा यांची पुण्यतिथी साजरी करतयं पुण्यतिथी योगीराज महाराज त्यांचीच असतीय पुण्यतिथी वालं योगीराज महाराज काय साधंसुधं नसतयं अब्जावधी कोटी रुपयांची प्रॉपर्टी कमावू द्या त्याची 96वी पुण्यतिथी साजरी होत नाही भगवंताचे नामस्मरण केलंय ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन केलय निसर्ग रोज ज्याच्या दृष्टिक्षेपात आहे अशा भगवंताचे नामस्मरण केले म्हणून यांच्या 96 व्या पुण्यतिथीला जवळजवळ पन्नास क्विंटल ची पुरणाची पोळी लागते ही काय सामान्य ताकत नाही त्या मालकावर झालेलं नामांच कर्ज आहे नामस्मरणाच कर्ज आहे म्हणून जगाचा मालक आपल्या सगळ्यांच्या हृदयात भावना जागृत करतोय
आता आपण बघू सुशिक्षित आणि अशिक्षित याच्यामध्ये काय तफावत आहे त्याचं काय झालं मला होत्या दोन मावश्या थोरली काय लय शिकलेली नव्हती आपलं कामापुरतं तिचा नवरा पण बारा बलूत्यापैकी एक होता तुटपुंज्या कामावरच सगळं चालायचं उशाला थोडी शेतीवाडी पण होती पण आमच्या घरी लग्न निघाल्यामुळे आईने आणि बाबांनी लग्नपत्रिका द्यायला मला तिच्याकडे पाठवले पूर्वीच्या काळी म्हणजे जास्त दळणवळणाची व्यवस्था नव्हती आम्ही रोड पासून जवळ जवळ सात आठ मैल आतल्या बाजूला राहायला होतो व मावशीचे घर पण काय रोडला लागून नव्हतं की अगदी रोडच्या जवळ पण नव्हतं म्हणून सायकलीवर पहाटे पहाटेच निघालो पहिल्यांदा मोठ्या मावशीकडे गेलो अकरा वाजले पोचायला मावशीनी विचारलं केव्हा निघाला मी सांगितलं पहाटे पाच वाजता निघालो तिने विचारलं काय खाल्लं का तुम्ही म्हणजे भाकरी बांधून आणली होती.
म्हसोबाच्या देवळाजवळ बसून खाल्ली म्हणजे अरे बापरे नऊ वाजता तू भाकरी खाल्ली किती भूक लागली असल दोन भाकरी चूरल्या त्याच्यावर तीन वाट्या कढी टाकली मस्त काला केला मेल्या खा म्हणाली आणि खाऊ घातले पुढे धाकट्या मावशीकडे गेलो होतो ती तिसऱ्या मजल्यावर राहत होती म्हणजे एक बर झालं कोणी भिकारी जरी आला तरी वरून सांगायचं आम्हाला वाढायचं नाही…काम मिटलं खालच्या मजल्यावर बेलचे बटन होतं ते काय मी दाबलं नाही उलट नुसती धाडधाड कडी वाजवली झालं बेल नाही दाबायची का म्हणून बघितलं तर मी अरे बापरे कवा आला कशाला आला मनात म्हणाली उन्हाळ्यामध्ये आंब्याचे दिवस होते म्हटलं मावशी आंब्याचा रस करेल नाहीतर आज रविवार आहे काहीतरी मटन वगैरे खाऊ घालेल तिच्या नवऱ्याला चांगला 70 हजार रुपये पगार होता स्वतःचं तीन मजली घर होतं नोकर-चाकर होते पण त्याला काय चाटायचं का मावशी गरीब होती तिने दोन भाकरी आणि कढी मेल्या खा म्हणून खाऊ घातली हिणं नुसतच गोड बोलायचं काम केलं आल्या आल्या तू उन्हातून आलाय घाम आलाय पंखा लावू का चहा करू का नुसतच गोड बोलायचं अन पूर्ण शिकलेली नव्हती पण दोन शिव्या दिल्या खा मेल्या म्हणून पोटभर खाऊ घातलं आणि हिने गोड बोलून मोकळं पाठवलं हाय का नाही डोक्यात बसाय सारखा फरक
आता आपण एक वेगळे गणित बघू कोणी याला गणित म्हणत कोणी बीजगणित म्हणत असेल कोणी त्याला धर्म गणित म्हणत असेल त्याचं काय झालं पाच पांडव अन त्यांची बायको द्रौपदी यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला ही पाच जण म्हणजे युधिष्टीर.. भीम… अर्जुन…नकुल आणि सहदेव हे पाच जण पहाटे पाच वाजता नदीवर आंघोळीला जायची आणि परत येताना पाहिलं तर द्रौपदीने पण अंघोळ केलेली असायची आता पांडवाचा आश्रम त्या पवित्र गंगेच्या तीरावर होता एवढं मात्र खरं की भारतीय संस्कृतीतल्या बाईला त्या चार दिवसाच्या ठराविक दिवसात गंगा किंवा इतर कोणतीही पवित्र नदी बाटवता येत नाही आणि आता ही खरं गणित पण हाय की त्या कालावधीत तिला नदीवर जाता येत नव्हतं आणि त्या पाच पांडवापैकी पण कोणी एकजण सुद्धा तिला पाणी आणून देत नव्हतं मग ती आंघोळ कुठे करायची हा झाला खरा प्रश्न ?
असं करता करता करता अकरा वर्षाचा वनवास काळात ती आंघोळ करायची राहिली नाही कोणीतरी तिला अदृश्य शक्ती पाणी आणून द्यायची एकेदिवशी युधिष्ठिराने तिला प्रश्न केला हे द्रोपदी… साडे अकरा वर्षाच्या वनवासाच्या काळात प्रत्येक वेळी तू आचरण शील स्त्री असल्यामुळे गंगा काय बाटवली नाही पण आम्ही नदीवर आंघोळीला गेल्यावर तू इकडे आंघोळ करायची मी पाणी दिलं नाही भीमानी दिलं नाही अर्जुनाने दिलं नाही नकुल-सहदेव यांनी पण पाणी दिलं नाही मग तुला पाणी कोण देत होतं तिनं सांगितलं मी पहाटे झोपेतून उठल्यावर उशाला आणि पायथ्याला कोणी तरी 2 माठ भरून पाणी ठेवतंय एवढं मात्र खरं की भीमाने सिद्धांत सांगितला की हे खरं आहे व द्रौपदी आपण वनवासात आहोत तोपर्यंत ही गोष्ट गुप्त आहे पण जेंव्हा आपण हस्तिनापूरला जाऊ त्यावेळेला कालांतराने ही गोष्ट बहुचर्चित होईल पांडव पाच असून सुद्धा द्रौपदीला पाणी देत नाही मग पाणी वनवास काळामध्ये कोण देत होतं ही बाब लोक सर्वजण तोंडामध्ये घाण घेऊन चर्चा करतील त्या प्रत्येकाचं निरसन आत्ताच झालं पाहिजे तुला पाणी कोण देतो तो तिने हात जोडले व म्हणाली ब्रह्मांडाच्या मालका इतक मी तुम्हाला देव मानते आपल्या पायाच्या साक्षीनं शपथ घेते पाणी कोण देत आहेत ते मला माहित नाही त्यांनी केलं भगवंताला आव्हान त्याच्यामुळे भगवंत आले आणि ते म्हणाले पाणी कोण देते हे फक्त पंढरपुरातल्या त्या मालकालाच माहिती त्यांनी त्या मालकाला सुद्धा हाच प्रश्न विचारला तर त्या पंढरपूरच्या जगाच्या मालकांनी सांगितलं की मला सोळा हजार एकशे आठ बायका 48 हजार तीनशे 24 मुली आणि 61 हजार 80 मुलं आहेत सगळ्यांची मिळून 56 कोटी देवाच्या प्रत्येक स्त्रीला तीन तीन मुली आणि दहा -दहा मुले आहेत आता बघू सोळा हजार एकशे आठ गुणिले तेरा… आणि सोळा हजार एकशे आठ गुणिले दहा हे सगळे मिळून 56 कोटी संख्या होती.
हेही वाचा – ********** चला गोंधळाला जाऊ *********
अहो धर्मराज पंधरा-पंधरा दिवस माझा नातुचं मला दिसत नाही महिना-महिना एकेक बायकोची भेट होत नाही मोठा परिवार माझ्या मागे आहे आणि मी कशाला हिला पाणी देऊ कधी द्रौपदीला पाणी देऊ मला काय माहिती नाही पटकन हे द्रौपदीच्या हे लक्षात आलं की आता जर ही गोष्ट कळली तर आपले मालक कायमस्वरूपी विचारत राहतील नसता हाताने सासरवास द्रोपदी झाडाच्या आड गेली आणि आवाज दिला दादा ssss द्रौपदी देवाला भाऊ मानायची देव पण हिला बहीण मानायचे देवा ssss पाणी कोण देतयं याच्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही पण माझ्या भीम नावाच्या पतीच्या मनात थोडी सल आहे ती सुद्धा वाईट नाही उद्या माझ्या भविष्यासाठी आजच दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होणे गरजेचे आहे ताई मी देतोय मी देतोय भीमाला बोलावलं व सांगितलं माझ्या ताईला आंघोळीला पाणी मी देतोय माझी ताई उशाला दगड आणि पाठीला गवत घेऊन झोपती तिला किती घाम येत असेल किती अंग कणकण करत असेल म्हणून मी माझा पूर्ण परिवार रात्री झोपल्यावर दोन प्रहर संपल्यावर तिसरा प्रहर आला कि पाणी आणून देत होतो केवढी त्या विधात्याची आपल्या भक्तावर माया…….
आता आपण म्हणतो टीव्ही घरात आला घराला शोभा आली घरात फ्रिज आला घराला घरपण आलं पण घरात चांगलं पुस्तक आलं ना कि सगळ्या घराला चांगलं शहाणपण येईल घर शहाणं होईल हे बघायचं सृष्टीतील फुले आज ना उद्या कोमेजुन जातील पण साहित्यातील शब्द फुले आपल्या सगळ्यांच्या जगण्याला आनंद देतील सातारा जिल्ह्यातील पाटणला कोयना नदी आहे पाणी मस वाहत आहे पण वाहत्या प्रवाहात हात घातला तर थंडगार लागते झटका बसत नाही पण तेच पाणी पोफळीला पळवत नेऊन एका खोल विहिरीत सोडलं जातं त्या पाण्याला प्रचंड गती दिली जाते मग त्यातून ऊर्जा निर्माण होते आणि त्याच पाण्यातून वीज जन्माला येते ती वीज महाराष्ट्रातील अंधार आणि कोपरा न कोपरा प्रकाशमान करते जरा आपण यावर विचार करू घरी ग्लासामध्ये सुद्धा पाणी आहे पण त्या पाण्यामध्ये वीज नाही एवढं खरं वीज पाण्यातच असते तिला प्रगट व्हायचं असल तर पाण्याला गती द्यावी लागते लोणी हे ताकात असत ताक घुसळावं लागतं त्याला गती द्यावी लागते तेव्हा लोणी जन्माला येते तसंच चैतन्य मनामध्ये असतं मन घुसळावे लागतं तेव्हा चैतन्य जन्माला येतं
……………………………………………..
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here