उद्या वीट येथे सर्व रोग निदान शिबिर; मोफत औषधी व चष्म्याचे ही होणार वाटप

उद्या वीट येथे सर्व रोग निदान शिबिर; मोफत औषधी व चष्म्याचे ही होणार वाटप

केतूर (अभय माने ) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वीट ( ता. करमाळा ) येथे उद्या रविवार 25 जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरांची चळवळ सुरू आहे

येथे होणारे आरोग्य शिबिरात हृदय विकारासंदर्भात तपासणी डोळे तपासणी कॅन्सर तपासणी सह 16 प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत या तपासण्या करण्यासाठी पुणे नगर सोलापूर येथील जवळपास 50 नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहे डोळ्याची तपासणी करून मोफत चष्म्याची वाटप केले जाणार आहेत

तसेच या शिबिरात तपासणी केलेल्या काही रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियाची गरज भासली तर तर अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे
आजारांना उपचाराला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षामार्फत मदत दिली जाणार आहे.

या शिबिरासाठी आत्तापर्यंत पाचशे रुग्णांनी केली असून जवळपास दोन हजार पेशंट याचा फायदा घेतला असा अंदाज आहे

वीट विकास फाउंडेशन या संस्थेची निर्मिती राजकारण विरोध झाली असून या संस्थेच्या फाउंडेशनच्या माध्यमातून वीट ग्रामस्थांसाठी अनेक लोक उपयोगी कार्यक्रम राबवले जातात.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची मागणी; वाचा सविस्तर

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; वाचा सविस्तर..

वीट ग्रामस्थांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी व्हावी या भूमिकेतून वीट फाउंडेशन या संस्थेने या शिबिराचे नियोजन केले आहे

या ठिकाणी रक्तदान शिबिर ही आयोजित केली असून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रक्तदान करून प्रत्यक्ष प्रेमींनी आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन वीट विकास फाउंडेशनने केले आहे .

 

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line