हिंगणी येथे गोमातेचे पूजन करून वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी

हिंगणी येथे गोमातेचे पूजन करून वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी

केत्तूर (अभय माने) हिंगणी(ता.करमाळा) गावात प्रथमच वसुबारस निमित्त गोमातेची भव्य शोभा यात्रा थाटामाटात करण्यात आली.

यावेळी सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत संपूर्ण गावांमधील प्रमुख मार्गावर महिला वर्गाने औक्षण करून नैवेद्य दाखवून गोमातेची पूजा करण्यात आली.गावातील सर्व लहान थोर सर्व धर्माच्या अभिमानासाठी या मिरवणुकीत सामील होते. अगदी गाय म्हणजे आपली मायच आहे या उद्देशाने भव्यदिव्य मिरवणूक पार पडली.

सनातन हिंदु धर्मासाठी मोलाचे सहकार्य म्हणून बजरंग दल हिंगणी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांबरोबरच फटाक्याची आतिषबाजी करून पार पाडण्यात आला.

हिंदू धर्मात आई नंतरची दुसरी माय म्हणजे गाय आज तिला पुजन्याचा दिवस म्हणजे वसुबारस होय.

दिवाळी सणातील महत्त्वाचा दिवस म्हणजे गो पूजनाचा दिवस गाईगुरांना पूजनाचा दिवस.गाई गुरांना पूजनाचा दिवस अर्थात वसुबारस,गोबारस या दिवशी वासरांसह गाईंची पूजा करण्याची पद्धती आहे.गाईपुढे सर्व कुटुंबियांना सुखी ठेव अशी प्रार्थना करण्याची पद्धती आहे.

हेही वाचा – पोफळज (ता.करमाळा) पर्यावरणपूरक आकाश कंदील किल्ला व पणती रंगवून व शुभेच्छा कार्ड तयार करून दिवाळीचे स्वागत. विद्यार्थ्यांनी केला फटाके मुक्त उत्सवाचा साजरा करण्याचा संकल्प.

चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी….
एकूणच दिवाळीची सुरुवात गाईंच्या पूजनाने म्हणजे वसुबारसणी होते.भारतीय संस्कृतीमध्ये गाईला गोधन,देवता मानले जाते.हिंगणी (ता.करमाळा) येथे वसुबारस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.

छायाचित्र – हिंगणी (ता.करमाळा): भैरवनाथ मंदिरासमोर गोमातेचे पूजन करताना महिला मंडळी व ग्रामस्थ

karmalamadhanews24: