आम्ही साहित्यिकदेश/विदेशमहाराष्ट्रमाणुसकीराजकारणराष्ट्रीय घडामोडी

तो म्हणाला थाळ्या वाजवा, दिवे लावा, आम्ही मात्र छाती बडवत चीता आणि स्मशान धगधगत पाहू लागलो!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

“…. पर आयेगा तो मोदी ही”

तो म्हणाला विदेशातून काळा पैसा आणणार,
आणि आम्ही मनात १५ लाखांची खरेदी सुद्धा करून टाकली!

तो म्हणाला महागाईचा मुडदा पाडणार,
आम्ही आमची स्वस्त मत फुकटात त्याच्या पदरी टाकली!

तो म्हणाला नोटबंदी करू आणि काळा पैसा संपवू,
आम्ही दिवसभर उन्हा तन्हात रांगेत उभे राहून मेलो!

तो म्हणाला पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवू,
पण आम्ही खोऱ्याने जवानांना श्रद्धांजली वाहत राहिलो!

तो म्हणाला कोरोनाला २१ दिवसात संपवू,
आम्ही फक्त हरलेली आणि हरवलेली जिवलग माणसं मोजत राहिलो!

तो म्हणाला पैसे द्या, दान करा, मदत करा,
त्याने त्यात आमदार खासदार विकत घेतले, आम्ही मात्र मूर्खा सारखे हिशोब मागत राहिलो!

तो म्हणाला थाळ्या वाजवा, दिवे लावा,
आम्ही मात्र छाती बडवत चीता आणि स्मशान धगधगत पाहू लागलो!

तो म्हणाला आपण जगभर लस फुकटात वाटू,
आम्ही मात्र लसीसाठी सुद्धा चेंगराचेंगरी करू लागलो!

तो म्हणाला आपण विश्र्वगुरु झालो,
आम्ही मात्र हवेसाठी तडफडून मेलो!

तो म्हणाला निवडणुका घेऊन गर्दी जमवू,
आम्ही मात्र रोजी रोटी सुद्धा गमावून बसलो!

तो म्हणाला आपण मोठ्ठं श्री राम मंदिर बांधू,
आम्ही मात्र हॉस्पिटल मध्ये बेड शोधता शोधता श्रीरामांच्या गावी गेलो!

तो म्हणाला इवल्याश्या घरात, संसद भवनात राहवत नाही,
नवीन घर, नवीन संसद भवन बांधू,
आम्ही मात्र राहती घर विकून हॉस्पिटलची बिल भरत राहिलो!

तो म्हणाला सरकारी कंपन्या, बँकांचा खर्च परवडत नाही, विकून टाकू,
आम्ही मात्र आयुष्यभराची कमाई बँकेतून काढता काढता बेजार झालो!

तो म्हणाला मी झोला उचलून निघून जाईल,
आम्ही मात्र विनोद समजून हसत राहिलो,
हसता हसता मरत राहिलो,
मरताना सुद्धा रडत राहिलो,
मरताना सुद्धा कुढत राहिलो!

त्यावर तो फार दुःखी झाला, मन की बात बोलला, अत्यंत खेदाने बोलला “….. आएगा तो मोदी ही” !!!!

कवी लेखक – अनामिक

(ही रचना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.)

litsbros

Comment here