वाशिंबे गावात कृषीदुतांचे स्वागत
केत्तूर (अभय माने) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथील चर्तुथ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाशिंबे गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
कृषिदूत प्रविण लोंढे, गणेश गिड्डे, धनंजय ढाकणे, अभिषेक वाघ, अविनाश डोंगरे, प्रकाश यादव, प्रसाद गवळी यांचा समावेश असून ते शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती समाजातील सामाजिक स्थिती पीक पद्धती इ. विविध गोष्टीचा अभ्यास करणार आहेत.
त्या बरोबर शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर, गांडुळखत निर्मिती, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व
संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी – गणेश चिवटे
या कार्यक्रमाला संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ.कल्यानीताई नेवसे, सचिव श्री.राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे सर, प्राचार्य डॉ.रामदास बिटे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने सर व प्रा.सचिन अढाव सर व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या प्रसंगी गावचे सरपंच श्री.तानाजी झोळ, उपसरपंच श्री.धोंडीराम कळसाईत, ग्राम कृषि सहाय्यक श्री.सागर होळकर, प्रगतशील बागायतदार श्री.प्रदीप राऊत, श्री.प्रताप झोळ, श्री.प्रशांत वाळुंजकर, व इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.