करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जननायक, धरती आबा बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सचिन गात अध्यक्ष शा.व्य.समिती हे होते.

मुख्याध्यापक श्री जनार्दन घाडगे व शिक्षक श्री विश्वनाथ धुमाळे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. अध्यक्ष सचिन गात पुढे बोलताना म्हणाले, बिरसा मुंडा व इतरही क्रांतिकारकांचा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे, आणि जर या पृथ्वीला (ग्लोबल वार्मिंग पासून..) वाचवायचे असेल तर आदिवासीची जीवनशैली इतर समाजानेही स्विकारणे गरजेचे आहे ,असे सांगितले.

कु.सानिका मस्के, कु. श्रेया बेडकुते, कु. नम्रता हांडे, शिवरूद्र पाटील व साईराज गात या विद्यार्थ्यांनेही सुंदर असे भाषणे केली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय बेडकुते व आभार श्रीमती भागीरथी माने मँडम यांनी मानले.

हेही वाचा – पंतप्रधान किसान योजनेच्या दोन हजारांच्या हप्त्याशिवाय मिळणार 3000 रुपयांची पेन्शन, शेतकऱ्यांनी अर्ज कसा भरावा?

सोलापूर मार्गावरून महत्वाच्या असणाऱ्या ‘या’ सर्व रेल्वेगाड्या १५ नोव्हेंबर पासून नियमित धावणार ; वाचा सविस्तर

तसेच श्री शशिकांत तळेकर, श्रीमती हेमा विद्वत, श्रीमती अनुपमा वनवे, श्रीमती अश्विनी नलवडे ..इ. सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून पार पडला.

litsbros

Comment here