वांगी नं.१ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधि : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त दरवर्षी वांगी येथे विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन युवा ग्रुप वांगी व गोविंद देशमुख फॅन्स क्लब, वांगी यांनी केले.
यामध्ये 75 पुरुष व महिला यांनी रक्तदान केले. शिवजयंतीनिमित्त व रक्तदान शिबिरास तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी भेट दिली.
याप्रसंगी शहाजीराव देशमुख सर, शेलगाव चे सरपंच अमर ठोंबरे,बंडगर सर,सुहास रोकडे,दत्ताबापू देशमुख,युवराज रोकडे,दिगंबर देशमुख अप्पा चौगुले यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी ढोकरीचे सरपंच किरण बोरकर,विठ्ठल शेळके,डॉ.शेळके, रामेश्वर तळेकर, बबन अप्पा देशमुख,दशरथ देशमुख, सुधीरबापू देशमुख,विकास पाटील,संतोष देशमुख ,दिनेश देशमुख,गणेश देशमुख,
गोविंद देशमुख,राज देशमुख, तुषार साळुंखे, अण्णा माने,रोहित देशमुख, निखिल पवार सर्व आयोजक यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.छत्रपतींच्या जयंतीनिमित्त एक आदर्श उपक्रम राबवल्याबद्दल व सर्व रक्तदात्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
Comment here