करमाळामाणुसकीसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

वाढदिवसानिमित्त देणगी : समाजाला आदर्श उपक्रम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाढदिवसानिमित्त देणगी : समाजाला आदर्श उपक्रम

केतूर (अभय माने); रमेश नरसिंह कुलकर्णी (स्वयंसेवक) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे सहस्र चंद्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला असून एक सामाजिक कार्य म्हणून पुणे येथील भटके-विमुक्त प्रतिष्ठानला त्यांनी 81 हजार रुपये देणगी दिली आहे.ही देणगी प्रतिष्ठाणचे विजय पुराणिक यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.

रमेश कुलकर्णी हे मूळचे करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथील रहिवासी असून त्यांनी करमाळा तालुक्यात आरोग्य खात्यात आपली सेवा केली त्याबरोबरच त्यांनी तालुक्यामध्ये पत्रकारिताही केली निवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले.

दि. 12 नोव्हेबर रोजी पुणे येथील लक्ष्मण भुवन,सदाशिव पेठ,पेशवाई जवळ सहस्त्र चंद्र दर्शन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष महादेवराव भंडारी तसेच पुणे जनता बँकेचे अध्यक्ष माधव मोटे हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – मोठी बातमी- करमाळा तालुक्यातील ‘या’ ५१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका डिसेंबर मध्ये होणार; प्रभाग रचना जाहीर

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी १० वर्ष सश्रम कारावास, ५० हजार रुपये पिडीतेस नुकसान भरपाई चा आदेश, माढा तालुक्यातील घटना

कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगी बद्दल यांनी आभार मानले आहे व त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

litsbros

Comment here