श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी पर्यावरणीय रक्षाबंधन हा उपक्रम उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी पर्यावरणीय रक्षाबंधन हा उपक्रम उत्साहात साजरा

केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी पर्यावरणीय रक्षाबंधन हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व छत्रपती शिवाजी हायस्कूल, धाराशिवचे मा.मुख्याध्यापक श्री पांडुरंग चव्हाण हे उपस्थित होते.


यावेळी प्रथम परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर श्री पांडुरंग चव्हाण सर यांनी मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले. आपली जडणघडण परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीमुळे झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करीत, ग्रामीण भागातील हे एक सुसंस्कार देणारे व्यक्तिमत्व विकास केंद्र असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पर्यावरणीय रक्षाबंधन या उपक्रमाविषयी माहिती दिली व झाडे लावा,झाडे वाचवा असा संदेश दिला.

हेही वाचा – विधानसभेसाठी मीच सज्ज: माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भूमिकेने आ. संजय शिंदेंना धक्का तर जगताप गटात चैतन्य; वाचा सविस्तर

यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

यावेळी या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे ऑक्सिजन पार्क येथील विविध झाडांना राख्या बांधल्या. यावेळी येथील सर्व झाडे संवर्धन करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास प्राचार्य श्री सुभाष कदम, प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line