श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात NMMS सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार समारंभ संपन्न

श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात  NMMS सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार समारंभ संपन्न

केम प्रतिनिधी केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात सन 2022-23 NMMS सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार समारंभ संपन्न झाला.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष श्री सचिन रणशृंगारे, उपाध्यक्ष गणेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण गुरव यांनी प्रतिक्षा कळसाईत राष्ट्रीय स्कॉलरशिपधारक, वैष्णवी तळेकर, भाग्यलक्ष्मी तळेकर, वैभवी तळेकर,माहि तळेकर, भाग्य दोंड, शिवराज गायकवाड, सम्राज्ञी तळेकर,या सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – शेलगाव(क)च्या लेकीची कृषिसेवक पदी नियुक्ती; राज्यात चौथा क्रमांक, सर्वत्र कौतुक

श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

NMMS परीक्षेला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री टि.व्ही पवार सर,श्री जी.के जाधव सर, सौ.नरखेडकर मॅडम, कोंडलकर सर‌ यांचाही सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे उपाध्यक्ष गणेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण गुरव, प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी केला. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री के.एन वाघमारे सर यांनी केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line