करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

तालुक्याचा ऊसपट्टा ऊसतोड मजुरांनी गजबजू लागला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्याचा ऊसपट्टा ऊसतोड मजुरांनी गजबजू लागला

केतूर ( अभय माने); करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रात 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होणार असल्याने तसेच कोरोनाची दुसरी लाटही संपल्याच्या पार्श्वभूमीवर अंबालिका शुगर (कर्जत), बारामती ॲग्रो (इंदापूर), मकाई सहकारी (करमाळा), भैरवनाथ शुगर (करमाळा)आदि कारखान्याचे ऊसतोड मजूर तालुक्यात हजर झाले आहेत.

परिसरातील पारेवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, पोमलवाडी,टाकळी खातगाव येथे ऊस तोडण्यासाठी परजिल्ह्यातून तशीच परराज्यातून ऊसतोड कामगार मजूर दाखल झाले आहेत तर काही ठिकाणी दाखल होत आहेत.

15 ऑक्टोबर रोजी राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटणार असल्याने ऊस उत्पादक तसेच ऊसतोड मजुरांची लगबग सुरू झाली आहे. परिसरातील उजनी जलाशयाच्या पाण्यामुळे बागायती भाग मोठा असल्याने उसाचे क्षेत्रही मोठे आहे त्यामुळे परिसरात ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणावर येतात.

हेही वाचा – करमाळा पोलिसांची अवैध गुटखा विक्री प्रकरणी ‘या’ गावात मोठी कारवाई; पोलिसात गुन्हा दाखल

प्रवाशांची होतेय लूट त्यामुळे ‘केम-टेंभूर्णी व कुर्डुवाडी-केम’ या एसटी बस तात्काळ सुरू करण्याची मागणी

पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव, घरदार, मुलेबाळे सोडून ऊसतोड मजूर परिसरात दाखल होत आहेत.सध्या धुळे नंदुरबार नाशिक मालेगाव सटाणा पुसद जामखेड जालना यासह मध्यप्रदेश मधूनही ऊसतोड मजूर परिसरात आले आहेत.

litsbros

Comment here