महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने क्रांतिसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन
पुणे(प्रतिनिधी) ; क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे रहिवाशी व सध्या पुणे स्थित असणारे व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या ‘जगदीशब्द फाउंडेशन’ व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्यावतीने क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण महासोहळा पुण्यात महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे संपन्न होणार आहे.
या पुरस्कार वितरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वात्रटिकाकार व साहित्यिक रामदास फुटाणे असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख, आझम कॅम्पसचे पी.ए. इनामदार, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पत्रकार श्रीरंग गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयातील
वकील विजय कुरले, बार्टी संस्थेचे डेप्युटी कमिशनर उमेश सोनवणे यांच्यासह व्याख्याते जगदीश ओहोळ व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली माध्यमांना दिली.
राज्यातील उत्कृष्ट कार्य असणाऱ्या शिक्षक, शिक्षिका यांच्यासह पत्रकार, वकील, डॉक्टर, सामाजिक, राजकीय नेतृत्व, साहित्यिक, स्पर्धा परिक्षा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comment here