करमाळाधार्मिक

मार्गशीर्ष लक्ष्मी व्रतवैकल्याना सुरुवात; घराघरात पूजा पारायणे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मार्गशीर्ष लक्ष्मी व्रतवैकल्याना सुरुवात; घराघरात पूजा पारायणे

मार्गशीर्ष लक्ष्मी व्रतवैकल्याना सुरुवात

केत्तूर (अभय माने) : मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रतवैकल्यास सुरुवात झाल्याने या पहिल्या गुरुवारी सकाळी (ता.24) घरोघरी महिलामंडळींनी विडयाची पाने, कलश, श्रीफळ,हळदी कुंकू यांचे पूजन करून लक्ष्मीचा उपवास धरला होता.

हा उपवास मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिलामंडळी करतात.यामुळे विविध प्रकारची फळे तसेच फुले,विडयाची पाने, रांगोळी यांना बाजारात मागणी होती.

मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मीचा असतो संस्कृत मध्ये मार्गशीर्षला केशव मास असेही म्हटले गेले आहे कारण लक्ष्मी सोबत विष्णूचे स्वागत केले जाते. यावेळी लक्ष्मी स्त्रोत्राचे वाचनही केलें जाते .

पवित्र महिना मार्गशीर्ष आहे असे मानले जाते हा महिना देवदेवतांचा आराधनेसाठी
पवित्र व महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची श्रद्धेने उपासना केली जाते शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका किंवा सुवासिनींची पूजा केली जाते.अशाप्रकारे या मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व आहे.

छायाचित्र : मार्गशीर्ष लक्ष्मीव्रत (संग्रहित)

litsbros

Comment here